खोक्राळे येथे प्रेमसंबंधाच्या संशयाने कुरापत काढून कुटूंबातील चौघांना मारहाण; 11 जणांविरुद्ध गुन्हा

0
नंदुरबार । दि.19 । प्रतिनिधी-प्रेमसंबंधाच्या संशयाने कुरापत काढून एकास पत्नी व मुलासह मारहाण केल्याची घटना नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे येथे घडली. याप्रकरणी 11 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शाम दगा भिल रा.खोक्राळे ता.जि.नंदुरबार याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याचे एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याची कुरापत काढून त्याच्यासह त्याची पत्नी व दोघा मुलांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी धर्मा जंगलू भिल, वन्या भिल, बायजाबाई जंगलू भिल, हिराबाई धर्मा भिल, सुमनबाई वन्या भिल, गोविंदा धर्मा भिल, सुपडू वना भिल, गुल्या फुलसिंग भिल, जितू वन्या भिल, धर्मा भिल याची सासू, सकुबाई गुल्या भिल सर्व रा.खोक्राळे ता.नंदुरबार यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*