तळोदा येथे माळी समाजातर्फे सभामंडपाचे भूमिपूजन

0
तळोदा । श.प्र.-येथील श्री समस्त काचमाळी पंचच्या मंगल कार्यालयातील सभमंडपाचा भूमिपूजन समारंभ समाजाचे अध्यक्ष ईश्वरलाल मगरे यांच्या हस्ते पार पडला.
अध्यक्षस्थानी तळोदा पालिकेचे प्रतोद भरतभाई माळी होते. याप्रसंगी उपस्थित दात्यांनी 5 लाखाच्या देणग्या सभामंडप बांधकामासाठी दिल्या.
माळी समाज मंगल कार्यालयात समाज बांधव शहरवासीयांच्या सोयीसाठी 150 फूट लांब 80 फूट रुंद 30 फूट उंचीच्या भव्य अश्या सभामंडपाची निर्मीती करण्यात येत आहे.

त्यासोबत पार्किंग, लॉन आदी सोयीसुविधा करण्यात येणार आहेत. त्याचा भूमिपूजन समारंभ नुकताच पार पडला. भरकटत जाणार्‍या आजच्या युवा पिढीला दिशा देण्याची गरज असून हे कार्य जेष्ठांनी आणि आईवडीलांनी करावयाचे आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष, तथा समजाध्यक्ष भरतभाई माळी यांनी केले.

माळी समाजाने समाज बांधवांच्या मदतीने सावता माळी भवन मंगल कार्यालय अशी मोठी कामे केली असून आता भव्य अश्या 50 लाखाच्या सभा मंडप निर्माणासाठी सुद्धा शेतकरी,उद्योजक, व्यवसायी, नोकरदार, कष्टकरी या सर्वांनी यथाशक्ति सढळ हाताने मदत करावी असे आवाहन तळोदा माळी समाज पंच अध्यक्ष ईश्वरलाल मगरे यांनी केले.

यावेळी कॉलेज ट्रस्टचे माजी अध्यक्ष चुनीलाल सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुधीर माळी, देवमोगरा विद्याप्रसारकचे अध्यक्ष चेतन पवार, पालिकेचे बांधकाम सभापती संजय माळी, नगरसेवक पंकज राणे, भीमराव महाजन, पंचचे माजी अध्यक्ष नारायण माळी, मधुकर मगरे, माजी उपाध्यक्ष एन.बी.राजकुळे, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वासुदेव पवार, महिला मंडळ अध्यक्षा सौ.ललिता मगरे, उपाध्यक्षा मनीषा मगरे, सचिव जयश्री मगरे, माजी अध्यक्षा प्रमिला पवार, मीनल राणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक माळी समाज पंचचे उपाध्यक्ष विनायक माळी यांनी केले. सचिव मित्तल टवाळे यांनी सूत्रसंचलन केले. आभार पंच सदस्य अरविंद मगरे यांनी मानले.

भूमिपूजन समारंभात सभामंडपासाठी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वासुदेव पवार, सौ.प्रमिला पवार या दांपत्याने 1 लाख 11 हजार रुपये रोख देणगी दिली. ऐनवेळी दात्यांनी 5 लाखाच्या देणग्या जाहीर केल्या त्यात भरतभाई माळी 1 लाख 11 हजार रुपये, प्रा.सौ.ललिता पोपट मगरे यांनी 71 हजार रुपये, समाजाध्यक्ष ईश्वरलाल मगरे यांनी 65 हजार रुपये, प्रगतिशील शेतकरी पुंडलिक बाळा राजकुळे यांनी 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.

 

LEAVE A REPLY

*