जे.के.पार्कमध्ये ‘सिंगल फेज सोलर नेट मिटरिंग’ प्रणाली कार्यान्वित

0
नंदुरबार । प्रतिनिधी-शहरातील जे.के.पार्कमध्ये पहिली सिंगल फेज सोलर नेट मीटरींग प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीत सौरउर्जेचा वापर करुन त्याचे वीजेत रुपांतर करण्यात आले असून उर्वरित वीज ही वीज वितरण कंपनीला विक्री करण्यात आली आहे.
सलग 30 वर्ष वीज पुरवठा यातून होणार आहे. सौरउर्जेवरील पथदिव्यांमुळे जे.के.पार्कचा परिसर प्रकाशमय झाला आहे. विशेष म्हणजे पावसाळयातही ही प्रणाली कार्यान्वित राहणार आहे.
सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावे लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही.

मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध असून त्याची जाणीव लोकांमध्ये नाही. उलट स्वयंपाक करण्यासाठी लोक निसर्गातील झाडांची तोड करून ठेवतात.

यामुळे प्रतिवर्षी पर्यावरणाचा र्‍हास तर होतोच परंतू प्रदुषणही वाढते. परंतु त्याचा विचार कोणीही करत नाही. त्यामुळे सर्व लोकांनी सूर्यापासून मोफत मिळणार्‍या ऊर्जेचा वापर करून दैनंदीन जीवन जगण्याची शपथ घेतली तर कालानुरूप लोकांमध्ये बदल घडण्यास वेळ लागणार नाही. परिणामी पर्यावरण धोक्यात येणार नाही व प्रदूषणालादेखील आळा बसेल व संपूर्ण मानवी जीवन सुखमय होणार आहे.

विद्युत ऊर्जा, पवन ऊर्जा या महागड्या दारात मिळणार्‍या ऊर्जा आहेत. परंतु सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील 12 तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते.

उरलेल्या 12 तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्चसुद्धा अल्पप्रमाणात येतो.

विद्युत ऊर्जा जेव्हा अतिशय महत्त्वाची असते. त्यादिवशी मिळत नाही. परंतु सुर्यापासून मिळणारी ऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही.

म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणात सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. याच जाणीवेतून नंदुरबार शहरातील बायपास रस्त्यावरील कल्याणेश्वर मंदिराच्या शेजारील जागेवर असलेल्या जे.के.पार्कचे मालक डॉ.किस्मत शेख यांनी त्या परिसरात पहिली सिंगल फेज सोलर नेट मीटरींग प्रणाली कार्यान्वित केली आहे.

सदर प्रणालीत 4 किलो वॅट क्षमतेची वीज निर्मिती होत आहे. या सौर उर्जेवरुन झालेल्या वीजनिर्मितीवरुन जेके पार्क परिसरातील सर्व पथदिवे व इतर प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.

सदर उर्जानिर्मिती ही प्रदुषणरहीत आहे. या उर्जेमुळे शहरात प्रथमच पथदिवे सुरु करण्यात आलेले आहेत. सदर प्रणाली अत्यंत किफायतशीर व लाभदायक आहे.

सदर गुंतवणूक ही 2 ते 3 वर्षात पूर्णपणे वसुल होते. सौर पॅनल हे डीसी प्रवाहाचे एसी प्रवाहामध्ये रुपांतर करते. यासाठी एक इन्व्हर्टरचा वापर करण्यात येतो.

त्याचे विभवांतर अचूक व अत्यंत फायदेशीर आहे. सदर प्रणालीत वीज साठवण्याची गरज नसून सरळ वीज वितरण कंपनीला ग्रीडमधून वीज पाठविली जाते.

त्यामुळे बॅटरी मेंटेनन्सचीही बचत होते. सौर पॅनलची हमी 25 वर्षांची आहे. या प्रणालीमुळे जेकेपार्कला 30 वर्षापर्यंत अखंड वीज पुरवठा होणार आहे.

याठिकाणी ऑटोमेटीक टाईम स्विच लावण्यात आले असून पथदिवे नियोजीत वेळेवर सुरु होतात व वेळेवरच बंद होतात. त्यामुळे वीजेची बचतही मोठया प्रमाणावर होते.

या सौर उर्जा प्रणालीचे नुकतेच वीज वितरण कंपनीचे अभियंता पंजाबराव बोरसे, श्री.व्यास यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

सदर परिसरात 2 हजार वृक्ष लावून व त्यांचे संगोपन करुन परिसर वृक्षमय करण्यात आला आहे. त्यामुळे प्रदुषणालाही आळा बसणार आहे. डॉ.शेख यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत होत आहे.

 

LEAVE A REPLY

*