महावितरणची 10 लाखात फसवणूक

0
नंदुरबार । दि.17 । प्रतिनिधी-शहादा तालुक्यातील तीन गावात विद्युत मीटरमध्ये फेरफार करून व मीटर रिडींग कमी दाखवून वीज वितरण कंपनीची पावणेदहा लाखात फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक येथील एका ईलेक्ट्रिशीयनविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, नाशिक येथील ॠषी किरा इलेक्ट्रीकल्सचा मालक संदीप पोपट पगार रा.झुंबड सोसायटी, पंचवटी नाशिक याने शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे यशवंत प्रल्हाद बुवा, पाडळदा येथे पंकज जगदीश पाटील व डोंगरगांव येथील शेमळे यांच्या घरावरील मीटर रिडींगमध्ये फेरफार केले व नियमीत मीटर रिडींगपेक्षा कमी रिडींग दाखवून कमी युनिटची नोंद केली.

प्रत्यक्षात वापरलेल्या 7 हजार 908 युनिटची नोंद न करता कमी युनिट दाखवून महावितरण कंपनीचे 9 लाख 78 हजार 685 रुपयाचे नुकसान करून फसवणूक केली.

याप्रकरणी महावितरणचे शहादा येथील उपविभागीय कार्यकारी अभियंता नितीन श्रीकृष्ण अंब्रेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संदीप पगारविरूद्ध भादवि 420, 465 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*