दोन मुले असतांनाही मुलगी घेतली दत्तक,सुजालपूर येथील पाटील दाम्पत्याचा स्तुत्य निर्णय

0
धडगांव । प्रतिनिधी-सध्याच्या आधुनिक जगात स्त्री भु्रणहत्येचे प्रमाण समाजासाठी चिंतेचा विषय ठरले असून स्त्री भ्रुणहत्या शासनाने बर्‍याच प्रमाणात जनजागृती करून नागरीकांना जागृत करण्याचे काम केले.
त्याचप्रमाणे एखादे दाम्पत्य मुल दत्तक घेण्याचे ठरवते तर ते सर्वात अगोदर मुलगा दत्तक घेते, हे सर्वश्रृत आहे. परंतु कन्येला दत्तक घेण्याचा आदर्श पायंडा सुजालपूर (ता.नंदुरबार) येथील पाटील (गुजर) समाजातील एका दाम्पत्याने घडवला. या दाम्पत्याच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

सुजालपूर येथील मूळ रहिवासी सध्या शहादा येथे वास्तव्यास असलेले शहादा तालुक्यातील कन्साई येथील दिगंबरराव पाडवी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुदामभाई तुमडू पाटील व त्यांच्या धर्मपत्नी उर्मिलाबेन यांना दोन मुले आहेत.

मात्र, या दाम्पत्याला कन्या (मुलगी) नसल्याने त्यांना त्याबाबतची मनात खंत होती. त्यामुळे या दाम्पत्याकडे शिक्षणासाठी राहत असलेल्या अश्विनीबेन या मुलीला त्यांनी दत्तक घेतले.

त्याबाबतचा अधिकृतपणे दत्तक विधान कार्यक्रमही केला. मुलीला दत्तक घेवून सुदामभाई पाटील व त्यांच्या अर्धांगिनी उर्मिलाबेन यांनी समाजापुढे आदर्श पायंडा रुजवून कौतुकास्पद काम केले.

त्याबद्दल या दाम्पत्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. मुलगी ही दोन्ही घराची प्रकाश किरण असते. त्याच अनुषंगाने पाटील दाम्पत्यांनी आपली मनातील खंत दूर करण्यासाठी त्यांनी अश्विनीबेन या कन्येस विधीवत दत्तक विधान करून दत्तक घेतले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

 

LEAVE A REPLY

*