अडीच कोटींच्या विकासकामांना मान्यता

0
नंदुरबार । दि.17 । प्रतिनिधी-नंदुरबार नगरपालिकेतर्फे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अडीच कोटीच्या विकासकामांना सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.
उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिरात नगरपरिषदेतर्फे सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
यामध्ये एकूण 37 विषयांना मंजूरी देण्यात आली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश गिरी, सर्व सभापती, नगरसेवक, कार्यालय अधिक्षक मच्छिंद्र गुलाले, शेखर पाटील आदी उपस्थित होते.

नंदुरबार शहरातील रस्ते, डांबरीकरण, चौक सुशोभिकरण तसेच विविध विकासकामांसाठी एकुण 2 कोटी 34 लाख 96 हजाराच्या कामांना मंजूरी देण्यात आली.

नंदुरबार नगरपरिषदेत साई व्हिला नवी गिरीकुंज कॉलनी, आनंद कॉलनी येथे सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी व इतर कामांसाठी अंदाजे खर्चास मंजूरी देण्यात आली.

तसेच नवापूर वळण रस्त्यावरील नंदुरबार बिझनेस सेंटरलगत जून्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरणासाठी 9 लाख 77 हजार रूपये खर्चाच्या अंदाजपत्रकास मंजूरी देण्यात आली.

गजानन महाराज मंदीर ते स्वामीनारायण मंदीर लगत असलेल्या जून्या रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यासाठी 9 लाख 77 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

सी.बी. गार्डनजवळील चौक सुशोभिकरणासाठी 3 लाख 95 हजार रूपये खर्चास मंजूरी देण्यात आली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत रस्ते विकास प्रकल्पासाठी भौगोलिकदृष्ट्या पूर्ण झालेल्या कामांच्या 1 कोटी 82 लाख रुपयांच्या कामास मंजूरी देण्यात आली.

उन्हाळ्यासाठी आंबेबारा मध्यम प्रकल्पातून पाणी आरक्षीत करण्यासाठी येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागासाठी महेंद्र बोलेरो गाडीवरील रोडस्विपर मशीन खरेदी करण्यासाठी निविदांबाबत निर्णय घेण्यात आला.

तसेच ई.बी.इन्व्हायरो कंपनीला भाड्यापोटी दिलेली नगरपालिकेची वाहने परत ताब्यात घेण्याबाबत ठराव करण्यात आला.

कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात 1 हजार लीटर क्षमतेचे आरोह वॉटर प्रकल्प बसविण्यासाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियानांतर्गत शहरातील कोहीनूर टॉकीजजवळ असलेल्या होळकर धर्मशाळा येथे बेघरांना तात्पूरता निवारा देण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकास निधीतून शहरातील नळवा रोड व पार्वतीनगर परिसरात 25 विद्युत पोल खरेदी करून बसविण्यासाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

संजय टाऊन हॉल शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत सुरू असलेल्या बगिच्यात विद्युत रोषणाई करण्यासाठी 200 मीटर वायर खरेदी करण्यासाठी मंजूरी देण्यात आली.

नळवा रोड व पार्वतीनगर परिसरात 25 विद्युत पोल उभारण्यासाठी दिलेल्या मुदतीत प्राप्त झालेल्या निविदांबाबत निर्णय घेण्यात आला.

नंदुरबार नगरपरिषदेच्या स्टेशनरोडवरील सर्व्हे क्र.433/2 मधील नवीन व्यापारी संकुलासाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र उभारण्यासाठी निविदा मागविण्यात येवून त्यावर निर्णय घेण्यात आला.

शहरातील व्यंकटेशनगरमधील रस्ते, खडीकरण व डांबरीकर तसेच इतर 55 कामांसाठी प्राप्त झालेल्या निविदेस कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

रेणूका माधवनगर येथील रस्ते, खडीकरण व डांबरीकरण तसेच अन्य 9 कामांसाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. नंदुरबार शहरातील उड्डाणपूर ते सी.बी. पेट्रोलपंपपर्यंत रस्ते डांबरीकरण, डिव्हायडर व अन्य 4 कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेस कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

नंदुरबार शहरातील सर्व मालमत्ता धारकांना कचरा साठवून ठेवण्यासाठी प्रत्येकी 2 डस्टबीन देण्यात येणार असून त्यासाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

नगरपालिकेतील सागर कडोसे, मेहुल तेजी व शेखर जाधव यांना वारसा हक्काने सेवेत सामावून घेण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील भाडेकरूंची मुदत संपल्याने नुतनीकरण करून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या स्थानिक विकासनिधीतून पालिका क्षेत्रातील इंदिरा संजय नगर येथे 100 केव्ही.चे रोहित्र बसविण्यासाठी व दोन एच.टी. पोल बसविण्यासाठी येणार्‍या खर्चास मंजूरी देण्यात येवून अनुदान मागणीसाठी प्रस्ताव टाकण्यात आला.

नगरपालिकेच्या मालकीच्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिराची लायटींग बदलणे, पायर्‍यांना पट्टी लायटींग करणे व जून्या खुर्च्यांचा जाहीर लिलाव करणे यासाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

तसेच नवीन आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या खरेदी करण्याकरीता निविदा मागविण्यात येवून त्याबाबत निर्णय घेण्यात आला.

नंदुरबार नगरपरिषदेने शासन निर्देशाप्रमाणे उपकर व विकासशुल्क वसूल करण्यासाठी ठराव केलेला 56 रद्द करण्यात आला. शहरातील स्व.बटेसिंग रघुवंशी व्यापारी संकुलात ई-लायब्ररीच्या जागेवरील व नाट्यमंदिराजवळील बगिच्याची देखभाल व दुरूस्ती करण्याकरीता अभिकर्ता नियुक्त करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याकरीता कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

शहरातील सर्व प्रकारच्या पाईपलाईनची दुरूस्ती करून दुषित पाण्याचा दोष काढणे, लिकेज दूरूस्ती करणे, जलशुद्धीकरण केंद्र व पाण्याच्या टाक्या साफ करणे, वॉल ग्रिसींग व दुरूस्ती करणे यासाठी लागणार्‍या साहित्य खरेदीस व खर्चास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

कामनाथ बाबा रोडवरील ठगीदाईन विहिरीजवळ नवीन बुस्टरपंपाला लागणारी पंपींग मशिनरी बसविण्यासाठी तांत्रिक सल्लागार नेमण्याबाबत विचार करण्यात आला.

शहरातील हायमस्ट पोलवरील जूने दिवे काढून नवीन एल.ई.डी. दिवे बसविण्यासाठी खर्चास मंजूरी देण्यात आली. शहरातील धर्मराजनगर 1 मधील रस्ते डांबरीकरण करणे व अन्य 19 कामांच्या खर्चासाठी कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

नगरपालिका संचलित लोकमान्य टिळक विद्यालयाची दुरूस्ती व बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. नंदुरबार पालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक रेन वॉटर हावेस्टींग वापरत असतील अशा मालमत्ताधारकांना करात सवलत देण्याबाबत विचार विनीमय करण्यात आला.

नळवा येथे मलशुद्धीकरण केंद्राच्या खुल्या जागेस कुंपन बांधण्यासाठी अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. शहरातील सुधारीत विकास योजनेत सर्व्हे नं.4 मधील आरक्षण क्र.26 वरील खेळाचे मैदान, प्राथमिक शाळा, व पूर्व-पश्चिम विकास योजनेसाठी रस्त्यास बाधित होत असलेले क्षेत्र रहिवास भागात समाविष्ट करण्यासाठी विचारविनीमय करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*