‘बेटी बचाव-बेटी पढाव’ अभियानात नंदुरबारातील दीड हजार विद्यार्थिनींचा सहभाग

0
नंदुरबार। प्रतिनिधी-महाराष्ट्र राज्य विधीसेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार नंदुरबार येथे जिल्हा विधीसेवा प्राधिकरणातर्फे आज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज्य नाटय मंदिरात ‘बेटी बचाव बेटी पढाव’ अभियान राबविण्यात आले.
या कार्यक्रमात शहरातील 1500 विद्यार्थीनीं सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा न्या.सौ.प्राची कुलकर्णी उपस्थित होत्या.
प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे, जि.प.चे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन आदी उपस्थित होते.

नंदुरबार मुख्यालयातील सर्व न्यायालयीन अधिकारी, सरकारी वकील, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, जिल्हा वकील संघ नंदुरबारचे अध्यक्ष प्राधिकरणावरील पॅनल अ‍ॅडव्होकेट, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी, सदस्य राजाभाई दिवाण, लायन्स क्लब, लायन्स फेमिना क्लब, रोटरी क्लब आदींचे पदाधिकारी, जिल्हा शिक्षणाधिकारी गाडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधिकारी, तहसिलदार नितीन पाटील व सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राचार्य, उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरूवात सकाळी पोलीस मैदानावरून प्रभात फेरीने झाली व शिवाजी नाटय मंदिर येथे संमेलन घेण्यात आले. पाऊस सुरू असतांना देखील सर्व विद्यार्थीनी रॅलीत उत्साहाने सहभागी झालेल्या होत्या.

व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत जिल्हाविधी सेवा प्राधिकरणचे सचिव जहिर अब्बास शेख यांनी केले. शाळा महाविद्यालयात दहावी, बारावीत प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थीनींचा यावेळी गौरव करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात राष्ट्रीय व राज्य स्तरावर नैपुण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा गौरव करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. न्या. सौ.प्राची कुलकर्णी यांनी विद्यार्थीनींना मोठमोठी पदे सांभाळून देशाची नितांत सेवा करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी डॉ.काणे हायस्कुल, श्रॉफ हायस्कुल येथील विद्यार्थीनीं पथनाटय सादर केले. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी लायन्स क्लब, लायन्स फेमिना क्लब, रोटरी क्लब यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मिनाक्षी गिरी यांनी केले. आभार शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*