तोरणमाळच्या पर्यटकांना लवकरच सुविधा महंत योगी संजूनाथ यांचा मानस; गुरू गोरक्षनाथ गोशाळेचे भुमिपूजन

0
ब्राम्हणपुरी। वार्ताहर-धडगांव तालुक्यातील तोरणमाळ येथील गुरू गोरक्षनाथांच्या तपोभुमीचा सर्वांगिण विकास करून भक्ती गणासह पर्यटकांना लवकरच सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस महंत योगी संजुनाथ यांनी व्यक्त केला.
गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर गुरू गोरक्षनाथ गोशाळेचे भुमिपूजन नाथ संप्रदायाच्या परंपरेनुसार मंत्रोच्चाराच्या करण्यात आला. यावेळी महंत योगीनाथ महाराज, खेतीया माजी नगराध्यक्ष अरविंद बागुल, सेंधवा येथील उद्योगपती पंकज झवर, माजी नगरसेवक लोटन धोबी, भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र जमदाळे, उपाध्यक्ष विनोद जैन, भाजपा व्यापारी सेलचे अजित बाफना, हितेंद्र वर्मा, तोरणमाळचे माजी सरपंच पहाडसिंग नाईक, पोलीस पाटील, ओलसिंग नाईक आदी उपस्थित होते.

योगी संजुनाथ म्हणाले की, तोरणमाळ येथील गुरू गोरक्षनाथांची गादी संपूर्ण भारतातील एकमेव आहे. दोन हजार वर्षापुर्वीची ही तपोभुमी असून विकासापासून अद्यापही दूर आहे.

येथील भौगोलीक परिस्थिती पाहता या स्थानाचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून शक्य आहे. भक्तगण व पर्यटकांना सोयी सुविधेसाठी तीन एकर जागेत पाच मजली इमारतीचे काम प्रगती पथावर आहे.

आश्रमाच्या इमारतीच्या भाविकांसह पर्यटकांसाठी स्वतंत्र्य खोल्या, रेस्टॉरंट, जलतरण तलाव, व्हीडीओ कॉन्फरन्स, हॉल, विविध व्याधीवर उपचारासाठी आयुर्वेद चिकित्सालय, पंचकर्म, योग प्राणायाम केंद्रासह योग विद्यापीठाचे व्यावसायीक अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत.

या माध्यमातून स्थानिक रहिवाशांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. योगी संजुनाथ यांनी येथे आलेल्या भक्तांना नाथ परंपरेबरोबरच हिंदू, जैन, बौध्द, ख्रिश्चन, इस्लाम धर्माचा परस्पर संबंध कसा आहे, याविषयी माहिती सांगितली.

खेतीयाचे माजी नगराध्यक्ष अरविंद बागुल यांनी तोरणमाळ या तिर्थक्षेत्राची महिमा कथन करीत तोरणएमाळच्या विकासासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी सरपंच कांतीलाल पाडवी, तलावडीचे पोलीस पाटील मोहन पाडवी, भरत पाडवी, बजरंग दलचे संजय पटेल, राजु कोळी, वाजीदभाई, भगवान राजपूत, गिरधर मोरे आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*