धानोरा चौफुलीवर चारचाकी-मोटारसायकलची समोरासमोर धडक

0
नंदुरबार / तालुक्यातील धानोरा गावाजवळील चौफुलीवर चारचाकी व मोटरसायकलच्या धडकेत एक युवक जखमी झाला. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.

गुजरात राज्यातून भरधाव वेगाने नंदुरबारकडे निघालेल्या चारचाकी वाहन (क्र.एम.पी.09, ए.सी.2888) वरील चालकाने धानोरा गावाजवळून नटावदकडे जाणारी मोटरसायकल (क्र.एम.एच.18, एस.6560) हे एकमेकांवर आदळले.

यात मोटरसायकलस्वार मोहसीन राजू बेग रा.धानोरा हा जखमी झाला. धडक दिल्यानंतर चारचाकी वाहन 20 फुुट खोल खड्ड्यात उतरले.

यावेळी वाहनातील कोणालाही ईजा झाली नसल्याची माहिती आहे. धानोरा चौफुलीवर गतिरोधक नसल्याने काही दिवसांपूर्वी एका पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

LEAVE A REPLY

*