दोन वर्षापासून आदिवासी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित

0
मोदलपाडा ता.तळोदा । वार्ताहर-मागील दोन वर्षा पासून आदिवासी विद्यार्थ्यांना एकात्मिक आदिवासी विकास विभागाकडून शिष्यवृत्ती दिली नाही.
याकरिता आदिवासी विद्यार्थी व पालकांचा धडक मोर्चा प्रकल्प काढण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अशोक तांबोळी यांना निवेदन देण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2015-16 व 16-17 या दोन वर्षांची शिष्यवृत्ती आदिवासी विद्यार्थ्यांना मिळाली नसून या काळात वारंवार विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रकल्प विभागाच्या अधिकार्‍यांना लेखी व तोंडी सांगूनही अद्यापपर्यंत या कार्यालयाकडून ठोस कार्यवाही केली गेली नाही.

यामुळे शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळालेली नाही. आदिवासी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तात्काळ शिष्यवृत्तीची रक्कम जमा करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

या मोर्च्यांत विद्यार्थांचे पालक व नातेवाईक सुद्धा सामील झाले होते. मोर्चेकरी ठोस कार्यवाही शिवाय आपले आंदोलन मागे घेण्यास तयार नव्हते परंतु सहाय्यक प्रकल्प अधिकारी यांच्याकडून 15 दिवसात शिष्यवृत्तीचा प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी लेखी आश्वसनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात दयानंद चव्हाण, मोग्या भिल, मालती वळवी, सुनील पाडवी, विनोद माळी, राजू चव्हाण, जगन मोरे, राजेंद्र पाडवी, अनिल ठाकरे, यांसह सर्व तालुक्यातील विदयार्थी व पालक सहभागी झाले होते. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.

 

LEAVE A REPLY

*