मोदलपाडा येथे हगणदारीमुक्त कृती कार्यक्रम गावातून जनजागृती रॅली

0
मोदलपाडा । वार्ताहर-येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत समुदाय संचलित हागणदारी निर्मूलन कृती आराखडा नियोजन प्रक्रिया घेण्यात आली.
अ‍ॅग्रो एज्युकेशन संस्था अमळनेर यांच्यामार्फत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात एसजीएम माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

गावामधून दिंडी काढून जनजागृती काढण्यात आली होती. रॅलीत विद्यार्थ्यांनी स्वच्छता विविध घोषणा दिल्या. यानंतर ग्रामसभा घेऊन स्वच्छतेविषयी माहिती, सध्या पावसाळ्यात होणार्‍या साथीच्या आजाराविषयी, ग्रामस्थांना शौचालयाचे महत्व व घरोघरी शौचालय असले पाहिजे व स्वच्छता ही काळाची गरज असे तानाजी पाडवी यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले .

ज्या लाभार्थाचे स्वच्छ भारत मिशन यात नावे नव्हते त्या लाभार्थाचे नावे यादीत समाविष्ट करण्यात आले. प्रत्येकांनी शौचालय चे वापर करावे असे आवाहन सरपंच सुमनबाई पाडवी यांनी केले.
यावेळी सरपंच सुमनबाई पाडवी, जिल्हा दक्षता व सहनियंत्रण समितीचे सदस्य बलीराम पाडवी, पं.स.सदस्य हुपा वसावे, कालुसिंग महाराज, उपसरपंच जगदीश वळवी, पो.पा. विलास पाडवी, तंटामुक्ति अध्यक्ष रमेश गावित, ग्रामसेवक प्रशांत बिरारी, धरमदास पाडवी, राजू वळवी, दिला कारभारी, राजू गोना वळवी, सामा मोत्या वळवी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*