कळंबू ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

0
कळंबू ता.शहादा । दि.14 । वार्ताहर-शहादा तालुक्यातील कळंबू येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी प्रभाग रचना व आरक्षण काढण्याचा कार्यक्रम लहान मुलांकडून चिठ्ठी काढून जाहीर झाला आहे.
त्यासाठी गाव पातळीवर व शासन पातळीवर तयारी सुरू केली असून इच्छूकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केलेली दिसून येत आहे.
शहादा तालुक्यातील कळंबू येथील ग्रामपंचायतीची मुदत दि.31 ऑक्टोबर रोजी संपुष्टात येत आहे. त्यासाठी गावपातळीवर व शासन पातळीवर जोरदार तयारी सुरू आहे.

तसेच कळंबू ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे इतर मागास प्रवर्ग महिला राखीव (ओबीसी महिला) असून यावर्षी शासनाच्या निर्णयाने थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने जो गावात विकासकामे करेल त्यालाच मत दिले जाणार असल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. त्यामुळे अनेक इच्छूकांचा हिरमोड झालेला दिसून येत आहे.

गावात चार प्रभाग असून चार प्रभागातून 11 उमेदवारांसाठी नोव्हेंबर 2017 मध्ये निवडणूक होणार आहे. यासाठी वार्डरचना व आरक्षण काढण्याचा कार्यक्रम लहान मुलांकडून चिठ्ठी काढून जाहीर करण्यात आला.

त्यात वार्ड प्रभाग क्र.1 मध्ये ना.मा.प्र.स्त्री सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरूष, प्रभाग क्र.2 मध्ये अनुसूचित जमाती पुरूष, सर्वसाधारण स्त्री, प्रभाग 3 मध्ये ना.मा.प्र.पुरूष, ना.मा.प्र.स्त्री, अनुसूचित जमाती स्त्री तर प्रभाग क्र.4 मध्ये अनुसूचित जमाती पुरूष, अनुसूचित जमाती स्त्री, सर्वसाधारण पुरूष या प्रमाणे 4 प्रभागामध्ये 11 उमेदवारांसाठी निवडणूक होणार आहे.

त्यासाठी आतापासूनच अनेक नवीन चेहरे हे निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असून गावपातळीवर व वरिष्ठ स्तरावर फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे. अनेकांना निवडणूकीचे वेध लागले आहे.

आरक्षण काढत व प्रभाग रचनेच्या कार्यक्रमासाठी मंडळ अधिकारी एस.जी. वाडेकर, तलाठी, जे.डी. देसले, ग्रामविकास अधिकारी बी.बी. देसले, सरपंच अमरजीत कुवर, उपसरपंच सुकदेव माळी यांनी सरपंच प्रविण वाघ, ग्रामपंचायत सदस्य शांताराम बोरसे, दंगल बोरसे, संजय भदाणे, भारत कुवर, मुकेश बोरसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*