नियतकालिकातून महाविद्यालयाचे प्रतिबिंब उमटते -मनोज रघुवंशी

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-महाविद्यालयात तयार होणारे नियतकालिक हे त्या-त्या महाविद्यालयाचे प्रतिबिंब असते. कारण महाविद्यालयात वर्षभर राबविलेल्या विविध उपक्रमांबरोबर शैक्षणिक गुणवत्तेच्या आलेखाचे दर्शनही घडते.
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणारे हे नियतकालिक अतिशय दर्जेदार झाल्याचे प्रतिपादन संस्थेचे उपाध्यक्ष मनोजभैय्या रघुवंशी यांनी ‘प्रेरणा’ या नियतकालिकेच्या प्रकाशनप्रसंगी केले.
गजमल तुळशीराम पाटील महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2016-17 चे वार्षिक नियतकालिक ‘प्रेरणा’ या अंकाचे प्रकाशन मनोजभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी संस्थेचे सरचिटणीस यशवंतराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्राचार्य डॉ.व्ही.एस. श्रीवास्तव अध्यक्षस्थानी होते.

प्रेरणा नियतकालिकेचे संपादक उपप्राचार्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांनी प्रास्ताविकातून अंकांच्या वेगळेपणाची भूमिका मांडली तर प्रमुख अतिथी यशवंत पाटील यांनी महाविद्यालयाच्या या चळवळीचे कौतुक केले.

यावेळी मनोजभैय्या रघुवंशी यांच्या हस्ते ‘प्रेरणा’ नियतकालिकांचे संपादक डॉ.एम.जे. रघुवंशी, सदस्य प्रा.व्ही.एम. अहिरराव, प्रा.डॉ.विजया पाटील, प्रा.प्रफुल्ल पाटील, प्रा.ए.डी. आखाडे यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.माधव कदम यांनी केले तर आभार प्रा.ए.डी. आखाडे यांनी मानले. यावेळी सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*