लोकसेवा आयोगाची सात केंद्रांवर उद्या पूर्वपरीक्षा; प्रतिबंधात्मक आदेश जारी

0
नंदुरबार । प्रतिनिधी-महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक कक्ष अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक, विक्रीकर निरीक्षक पदांसाठी पूर्व परिक्षा दि.16 जुलै रोजी नंदुरबार शहरातील 7 केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
परिक्षेदरम्यान गैरप्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवून शकतो. यामुळे परिक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

नंदुरबार शहरातील श्रीमती एच.जी.श्रॉफ हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज, श्रीमती डी.आर. हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज, जी.टी.पी. महाविद्यालय, एनटीव्हीएस बीएड कॉलेज, कमला नेहरू कन्या विद्यालय, यशवंत विद्यालय, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल या 7 केंद्रांवर परिक्षा घेण्यात येणार आहे. परिक्षा केंद्रांच्या परिसरापासून 200 मीटरपर्यंतची सर्व झेरॉक्स सेंटर, सार्वजनिक टेलिफोन, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक बंद ठेवण्यात येणार आहे.

कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने व परिक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

 

LEAVE A REPLY

*