आरोग्य विभागाच्या बदल्यांबाबत समुपदेशन शिबिर

0
नंदुरबार / जिल्हा परिषदेत सर्वसाधारण बदल्यांच्या समुपदेशन शिबीराला मंगळवारपासून सुरुवात झाली.
या पार्श्वभूमीवर सकाळपासून जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले आरोग्य कर्मचारी जिल्हा परिषदेत दाखल झाले होते.
रात्री उशिरापर्यंत सुरु असलेलया या बदली शिबीरात मागणी आणि विनंती यात समन्वय साधणे अधिकार्‍यांना अवघड जात असल्याचे दिसून आले.

या शिबीरास सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांच्यासह सेविका उपस्थित होते. यांच्यासह सेविका उपस्थित होते.

या शिबीरात पाच टक्के विनंती तर 10 टक्के प्रशासकीय बदल्यांबाबत चर्चा करण्यात येवून आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व आरोग्य पर्यवेक्षक या वर्ग तीन आणि चारमधील सात पदांर नियुक्त कर्मचार्‍यांच्या बदल्या दीर्घ चर्चा करण्यात येवून मान्यता देण्यात आली.

यावेळी 111 आरोग्य कर्मचार्‍यांच्या बदल्यांवर निर्णय घेण्यात आला. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 59 प्राथमिक आरोग्य केंद्र व 290 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील मंजूर असलैलया 842 पैकी 744 पदांच्या बदली प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*