संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त भागवत व किर्तन सप्ताह

0
नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-येथे संत सावता भजनी मंडळ व नागेश्वर महादेव सेवा मंडळ तसेच समस्त माळी समाज यांच्यातर्फे दि.16 ते 22 जुलैदरम्यान संत सावता महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून भागवत कथा व किर्तन सप्ताह आयोजीत करण्यात आला आहे.
यानिमित्ताने आळंदी येथील प्रशिक्षित किर्तनकार राष्ट्रभक्ती, व्यसनमुक्ती व अध्यात्मिक विषयांवर ज्ञानदान करणार आहेत. भागवतकार म्हणून मथूरा येथील साध्वी कवितेश्वरी दिदी येणार आहेत.
रोज पहाटे 5 ते 6 प्रभातफेरी, 6 ते 7 काकड आरती, 2 ते 5 भागवत कथा, सायंकाळी 5 ते 6 हरीकथा व रात्री 8 वाजता किर्तन व भारूड याप्रमाणे 7 दिवस कार्यक्रम होणार असून दि.22 रोजी पालखी मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.16 रोजी गोकुळ महाराज गडखांबकर, दि.17 रोजी शाम महाराज घोडगांवकर, दि.18 रोजी गोपाळ महाराज सांजोरीकर, दि.19 रोजी बाळाकाका महाराज अनवरदेकर, दि.20 रोजी संध्याताई महाराज सुरत, दि.21 रोजी दिलीप महाराज बीडकर व दि.22 रोजी उमेश महाराज अंमळनेरकर यांच्या किर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत.

तर गायनाचार्य म्हणून ह.भ.प.श्रावण महाराज अक्राळेकर, भगवान महाराज नंदुरबारकर, आदीनाथ महाराज जळखेकर, भगवान महाराज जळखेकर, मृदुंगाचार्य पुुंढलिक महाराज वाडीकर, हार्मोनियम रविंद्र महाराज सिंदगव्हाणकर, विनेकरी भिमसिंग महाराज मांजरेकर आदी उपस्थित राहणार आहेत.

भाविकांनी या सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. माळीवाड्यातील संत सावता महाराज मंदिराच्या प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे.

 

LEAVE A REPLY

*