नियोजन समितीची आज बैठक पालकमंत्र्यांची उपस्थिती, जूनअखेर झालेल्या खर्चाचा आढावा

0
नंदुरबार । प्रतिनिधी-राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील क्रांतीवीर बिरसा मुंडा सभागृह येथे नंदुरबार जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पत्रकान्वये दिली.

या बैठकीत 22 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीमधील इतिवृत्तावरील केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वाचून कायम करणे, त्यावरील कार्यवाहीचा आढावा घेणे, जिल्हा वार्षिक योजना 2016-17 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनूसूचित जाती उपयोजना) या वार्षिक योजनांचा माहे मार्च 2017 अखेर व सन 2017-18 या वार्षिक योजनांचा जून 2017 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येईल.

या बैठकीस जिल्हा वार्षिक योजनेशी सर्व संबंधित कार्यान्वीत यंत्रणा, संविधानिक जिल्हा नियोजन समितीवरील सन्माननीय सदस्य, विशेष निमंत्रित सदस्य, यांनी उपस्थित रहावे अस आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कलशेट्टी यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*