कोचरामातेला बोणे देण्यासाठी तीन राज्यातील भाविकांची हजेरी

0
खेतिया । दि.13 । वार्ताहर-कोचरा ता.शहादा येथील कोचरा माता मंदिरात आषाढ महिन्याच्या मंगळवारी व शुक्रवारी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्यातील भाविक मोठया संख्येने कोचरा माताला नैवेद्य बोणे चढविण्यासाठी हजेरी लावत आहेत.
नवसाला पावणारी आई कोचरा माता तिन्ही राज्यातील भाविक भक्तांची श्रध्दास्थान आहे. बोणे नैवेद्यामध्ये मातेला प्रथम पाणी शिंपडून पुजाअर्चा करून दिवा, अगरबती लावली जाते.

नैवेद्य दही भात व घाटा मातेला दाखवण्यात येतो. काही भाविक भक्त मंडळी कोंबडा, बकराचा नवस करतात. तर काही भक्त दालबाटी, चुरम्याचा नैवेद्य दाखवतात.

परिसरातील काही भक्त महिलाही येथे दर्शनला येवून आई कोचरामातेचे दर्शन घेतात. हेे जागृत देवस्थान असल्याची भाविकांची श्रध्दा आहे.

दरम्यान मंदिर परिसरात मोठया संख्येने भक्त मंडळींनी येवून दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी म्हसावद पोलीसांनी बंदोबस्त ठेवला होता.

कोचरामाता मंदिर पर्यटन क्षेत्रात घेण्यात यावे. यासाठी पर्यटनमंत्री ना.जयकुमार रावल यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*