सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा !

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-विद्युत कर्मचार्‍याच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी धडगांव तालुक्यातील वीज वितरण कंपनीचा मयत कर्मचारी रमेश पावरा यांच्या पत्नी सायनी पावरा हिने पोलीस अधिक्षकांकडे दिलेल्या अर्जात केली आहे.

धडगांव येथील विद्युत वितरण कंपनीतील वरिष्ठ तंत्रज्ञ रमेश वेस्ता पावरा (32) रा. उमराणी (ता.धडगांव) हे दि.4 जून रोजी मौजे सिसा, बोरीडाबरपाडा चौफुलीजवळ विद्युत पोलवर चढून दुरूस्तीचे काम करीत असतांना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला.

वीज वितरण कंपनीतील सहाय्यक अभियंता एस.डी. समृतवार, ऑपरेटर रोहित वाघ हे हातधुई वीज उपकेंद्रातील अधिकारी व कर्मचारी या मृत्यूला जबाबदार आहेत.

त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व आमच्या कुटूंबियांना न्याय देण्यात यावा अशी मागणी कै.रमेश पावरा यांची पत्नी सायनी पावरा रा. उमराणी बु. (ता.धडगांव) यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

*