कला शाखेच्या अभ्यासक्रमात डॉ.अलका कुलकर्णींच्या ‘चकवा’ कादंबरीचा समावेश

0
नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे प्रथम वर्ष कला शाखेच्या नवीन अभ्यासक्रमात जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ.अलका कुलकर्णी यांच्या ‘चकवा’ या कादंबरीचा समावेश करण्यात आला आहे.
यंदाच्या अभ्यासक्रमात ही कादंबरी राहणार आहे. डॉ.कुलकर्णी यांचा विविध क्षेत्रात सक्रीय सहभाग असतो.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने जून 2017 पासून प्रथम वर्ष कला शाखेसाठी नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे.
त्यात मराठीच्या अभ्यासक्रमातील प्रथम सत्राच्या वाडःमय प्रकार कादंबरी या अभ्यासक्रमासाठी चकवा हे कादंबरी घेतली आहे.

त्यासाठी एकूण 45 तासिका देण्यात आल्या असून त्यात चकवा कादंबरीचे कथानक, कादरंबरीमधील सामाजिक जाणिवा व संघर्ष, विविध व्यक्तीरेखा, विज्ञानवादी दृष्टीकोन तसेच कादरंबरीतील अंधश्रध्दा निर्मुलन हे विषय घेतले आहेत.

चकवा ही कादंबरी सातपुडयातील डाकीण प्रथा व अंधश्रध्दा निर्मुलनावर आधारीत आहे. डॉ.अलका कुलकर्णी यांचे आतापर्यंत दहापेक्षा अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनाच्या त्या माजी अध्यक्ष आहेत. अंधश्रध्दा निर्मुलन कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग आहे. शहादा येथील कुलकर्णी हॉस्पिटलतर्फे दरवर्षी कुपोषित बालकांसाठी मोफत सेवा देण्यात येते.

 

LEAVE A REPLY

*