वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-नंदुरबार शहरातील वेगवेगळया रस्त्यांवर झालेल्या दोन अपघातात दोघांचा मृत्यू झाला. नवापूर चौफुलीजवळ झालेल्या अपघातात मिना नंदलाल धनवाला या पुणे येथील महिलेचा मृत्यू झाला.
अनिल गिरधरलाल अग्रवाल रा.दोंडाईचा जि. धुळे यांनी हे.कॉ. प्रमोद वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नंदुरबार शहरातील नवापूर चौफुलीजवळ एप्रिलमध्ये झालेल्या मारूती अल्टो (क्र.एम.एच.18- डब्ल्यु. 1835) ही गाडी उलटल्याने मिना धनवाला यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कारचालक अनिल गिरधारीलाल अग्रवाल याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या अपघातात अश्विन मिना अग्रवाल, पुजा अग्रवाल हे दोघे जखमी झाले होते व चालक अनिल अग्रवाल हा अपघाताची माहिती न देता पळून गेला होता. या घटनेतील कागदपत्र पुणे येथून येण्यास उशिर झाल्याने आज हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरमयान नंदुरबार- निझर रस्त्यावर सरवाळा फाटयाजवळ टाटा इंडीकार व बजाज पल्सर यांची समोरासमोर धडक झाल्याने मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

इंडीका चालक महेश मोहन पाडवी रा. हरदुली (गुजरात) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मन्यार रेहान मोहम्मद युनूस रा.नंदुरबार याने आपल्या ताब्यातील (क्र.एम.एच.20- बी.सी. 3241) भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल (क्र.एम.एच.15- बी.ई. 3998) ला जोरदार धडक दिल्याने त्यावरीलस्वार सागर गणेश ठाकरे (19) रा.हरदुली ता.निझर याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात मन्यार युनूस विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*