स्काऊट व गाईडची युनिट नोंदणी करण्याचे आवाहन

0
नंदुरबार । प्रतिनिधी-भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद यांनी शाळा तेथे कब बुलबुल स्काऊट, गाईड युनिट नोंदणी असा संकल्प केला आहे.
त्यासाठी आपल्या शाळेत सुरू असलेल्या युनिट व नवीन युनिटची नोंदणी चालू शैक्षणिक वर्षात करावयाची आहे.
स्काऊट गाईडवर यांच्या तालुकानिहाय सभा नंदुरबार स्किाऊट गाईड भवन नंदुरबार, शहादा वसंतराव नाईक विद्यालय, दि.13 जुलै रोजी तळोदा येथे न्यु हायस्कुल, दि.14 जुलै रोजी अक्कलकुवा येथे दुपारी 12 वाजता न्यु इंग्लिश स्कूल, धडगांव येथे दि.15 जुलै रोजी दुपारी 12 वाजता एस.व्ही.ठक्कार महाविद्यालय येथे युनियट नोंदणी, राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार, पंतप्रधान ढाल स्पर्धा, वार्षिक नियोजन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्वमाध्यमिक शाळा व आश्रमशाळामधील एक स्काऊटर एक गाईडर यांनी गणवेशात सभेच्या ठिकाणी उपस्थित रहावे.

सभेला प्रत्येक शाळेने सहभाग घ्यावा, असे शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक व नंदुरबार भारत स्काऊट आणि गाईडस जिल्हा कार्यालय यांनी आवाहन केले आहे. सर्व इच्छुक संस्थांनी त्वरीत युनिटची नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*