भूमी अभिलेखच्या रेकॉर्डमध्येचुकीच्या नोंदी

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-भूमी अभिलेखाच्या रेकॉर्ड ऑफ राईटमध्ये जाणून बुजून उलटसुलट नोंदी करून दुरूस्तीसाठी अपिलाच्या नावाखाली नागरीकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करणार्‍या नंदुरबार जिल्हा भूमी अभिलेख विभागाला ग्राहक मंचाने दणका दिला असून दोन हजाराचा आर्थिक दंड ठोठावले आहे.
नंदुरबार येथील अब्दुल अजीज अन्वर यांनी भूमी अभिलेख विभागाच्या कारभाराविरोधात ग्राहक मंचात दावा दाखल केला होता. अब्दुल अन्वर यांनी भूमी अभिलेखातील नोंदीच्या दुरूस्तीबाबत एक वर्ष अपिल व विनंत्या केल्या.

भूमी अभिलेखात खरेदी देणार्‍याचे नाव नसतांना बेकायदेशीर नोंद करण्यात आली आहे. सदरची नोंद दुरूस्त करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून अब्दुल अन्वर प्रयत्न करीत आहेत.

भूमी अभिलेख विभागातील भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी मात्र जाणून बुजून सदोष उलटसुलट नोंदी करत आहेत. त्या दुरूस्तीसाठी अपिलाच्या नावाखाली पैसे उकळत असल्याचा आरोप अब्दुल अन्वर यांनी केला होता.

भूमी अभिलेख विभागाने मात्र त्यांच्या चुकीच्या नोंदी दुरूस्ती न करता उलट उतार्‍यात दोष निर्माण केला. या दोषामुळे मालमत्ताधारकास त्याच्या सवेर्र्च्या नोंदींचा तपशिल जाणण्यासाठी दुसर्‍या सर्वेचा उतारा विनाकारण द्यावा लागत होता.

प्रत्येक वेळी शासनाला वेगवेगळी फी अदा करून उतारा काढावा लागत होता. ग्राहकमंचाने याबाबत ऐतिहासीक निर्णय घेत अब्दुल अन्वर यांच्या दाव्यानुसार भूमी अभिलेख विभागास नोंदी सविस्तर करून देण्याबाबत आदेश दिला.तसेच मानसिक व शारीरिक त्रासपोटी भूमी अभिलेख विभागाला दोन हजाराचा आर्थिक दंड ठोठावला आहे.

 

LEAVE A REPLY

*