प्रज्ञाशोध परीक्षेत डॉ.काणे गर्ल्स विद्यालयाचे यश

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल येथे नौरोसजी वाडीलया कॉलेज पुणे मार्फत एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत इ. 10 वी कृष्णा कैलास इंदाणी, सृष्टी श्रीराम मोडक या विद्यार्थीनी रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्रकाच्या मानकरी ठरल्या. एक विद्यार्थीनीस प्रशस्तीपत्रक मिळाले.

याच परीक्षेत इ.8 वीच्या 6 विद्यार्थीनी प्रविष्ठ झाल्या. त्यापैकी तीन विद्यार्थीनी प्रशस्तीपत्रकाच्या मानकरी ठरल्या. सदर विद्यार्थीनींना ज्येष्ठ विज्ञान शिक्षक पी.आर. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थीनींचे अ‍ॅड. परीक्षित मोडक, गिरीश खुंटे, नरेंद्र सराफ, प्रशांत पाठक, मुख्याध्यापिका सौ.भारती सुर्यवंशी, पर्यवेक्षक एन.के. भदाणे, शिक्षक, शिक्षीका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

 

LEAVE A REPLY

*