यशवंत महाविद्यालयात ‘श्यामची आई’ प्रयोग

0
नंदुरबार । प्रतिनिधी-येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता अकरावीच्या नवोगत विद्यार्थ्यांचे स्वागत व शामची आई या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे 11 वी कला व वाणिज्य शाखेतील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी प्रा.डॉ.माधव कदम यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शामची आई या प्रसंगातून मार्गदर्शन करुन महाविद्यालयात विद्यार्थी क्षणिक आनंदात कसा आयुष्य विसरुन जातो.

तसेच विद्यार्थ्याला यश शिखरावर पोहोचावयाचे असल्यास त्याने आपल्या मनाला शिस्त लावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

जसा पायाला चिखल लागू नये, याची काळजी आपण जीवनात घेतो, तशी आपल्या मनाला वाईट सवय लागू नये याचीही काळजी महाविद्यालयीन जीवनात घ्यावी, असा एक संदेश प्रत्येक विद्यार्थ्याला डॉ.कदम यांनी दिला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डी.एस.नाईक, प्रा.शैलेेंद्र पाटील, प्रा.आरती तवर, प्रा.निलेश कोळपकर, प्रा.संजय मराठे, प्रा.पंकज पाटील, प्रा.योगेश चौधरी, प्रा.भामरे, प्रा.के.डी.बंजारा, प्रा.मयुर ठाकरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी व नवागतांचे स्वागत उत्सुकतेने इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.निलेश कोळपकर यांनी तर आभार प्रा.शैलेंद्र पाटील यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

*