रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

0
नंदुरबार । दि.12 । प्रतिनिधी-येथील रोटरी क्लबचा नुतन पदाधिकार्‍यांचा पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रोटरी क्लब, नंदुरबारच्या अध्यक्ष म्हणून रविंद्र कुलकर्णी यांना तर सचिव म्हणून पंकज पाठक यांच्याकडे पद्भार सोपविण्यात आला.
शहरातील कन्यादान मंगल कार्यालय येथे दि.9 जुलै रोजी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, हिरा उद्योग समुहाचे प्रमुख डॉ.रविंद्र चौधरी, रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य यशवंतजी स्वर्गे, मावळते अध्यक्ष जितेद्र सोनार, मावळते सचिव शब्बीरभाई मेमन, प्रफुल्ल शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी रोटरी क्लब, नंदुरबारच्या सन 2017-18 वर्षाकरीता अध्यक्ष म्हणून रविंद्र कुलकर्णी यांना तर सचिव म्हणून पंकज पाठक यांच्याकडे पद्भार सोपवून त्यांना प्रमुख पाहुणे डॉ.मोहन चंदावकर यांनी पदग्रहणाची शपथ दिली.

ठाणे येथील रोटरी डिस्ट्रीक्ट 3142 चे डीजीएन व प्रसिद्ध गायनॉकॉलीजीस्ट डॉ.मोहन चंदावकर यांनी पदग्रहण अधिकारी म्हणून काम पाहीले.

मावळते सचिव शब्बीर मेमन यांनी मागील वर्षाचे अहवाल वाहन केले. तर मावळते अध्यक्ष जितेंद्र सोनार यांनी गतवर्षात केलेल्या कामांचा आढावा मांडला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ.चंद्रकांत रघुवंशी आपल्या मनोगतात म्हणाले की, रोटरी क्लब एक सामाजिक संस्था असून नेहमीच समाजासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते.

यावर्षी सुद्धा त्यांनी नगरपालिका व रोटरी क्लबच्या माध्यमातून एक्स-रे मशिन व सोनोग्राफी केंद्र सुरु करण्याचा मानस व्यक्त केला.

तसेच श्रॉफ हायस्कुल जवळील चौकास रोटरी चौक म्हणून सुशोभित करण्याचे आवाहन केले व नुतन पदाधिकार्‍यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.रविंद्र चौधरी म्हणाले की, अधिकाधिक समाज कार्य करुन तळागाळातील लोकांची सेवा करा, असे सांगून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय यशवंत स्वर्गे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ.राजेंद्र कासार व नागसेन पेंढारकर यांनी केले.

आभार नुतन सचिव पंकज पाठक यांनी मानले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे डॉ.विशाल चौधरी, जयकुमार गुजराथी, मनलालजी जैन, हिरालाल महाजन, अ‍ॅड.निलेश देसाई, निलेश तवर, प्रेम खन्ना, सुनिल सोनार, श्रीकांत बोडस, दीपक शाह, डॉ.दुर्गेश शाह, डॉ.निर्मल गुजराथी, दिलीप अग्रवाल, प्रदीप सोनार, दीपक सेवानी, संदीप गुरुबक्षाणी, नंदू सोनी, मिलिंद पहुरकर, के.के.ठाकूर, अर्जुसिंग वळवी, नरेश नानकाणी, भिकाबापू चौधरी आदी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

 

LEAVE A REPLY

*