एकतेशिवाय समाजाचा विकास होणार नाही

0
शहादा । दि.11 । ता.प्र.-बाबासाहेब दलितांचेच नव्हे तर सार्‍या देशाचे उद्धारक होते. त्यांनी तयार केलेल्या संविधानामुळेच देशाची एकसंघता टिकून आहे.
त्यांचे संविधान बदलण्याचे सामर्थ्य कोणातही नाही. मात्र, माणसाला बदलण्याचे सामर्थ त्यात आहे. संविधानामुळेच एकता निर्माण होते.
एकतेशिवाय समाजाचा विकास होणार नाही आणि देशही शक्तीशाली होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना.रामदास आठवले यांनी शहादा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी केले.
नोटाबंदीचे समर्थन करीत हे सरकार देशातील सर्वच घटकांच्या आर्थिक सामाजिक विकासासाठी कटीबध्द असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहादा येथे तहसिल कार्यालयानजिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा लोकार्पण ना.रामदास आठवले यांच्या हस्ते झाले.

याप्रसंगी आ.उदेसिंग पाडवी, सातपुडा कारखाना चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलालतात्या पाटील, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प.सदस्य जयपालसिंह रावल, बापुजी जगदेव, आरपीआय अध्यक्ष अरविंद कुवर, जि.प.समाजकल्याण सभापती आत्माराम बागले, सातपुडा कारखाना कार्यकारी संचालक पी.आर.पाटील, सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, बाबुराव कदम, संजय कदम, संजय पगारे, शशिकांत वाघ आदी उपस्थित होते.

ना.आठवले म्हणाले, बाबासाहेबांनी प्रत्येक जातीधर्माच्या लोकांना ताकद देण्याचे काम केले आहे. त्यामुळे समाजात परिवर्तन होत आहे. पुर्वी आम्हाला कोणीही जवळ घेत नव्हते.

मात्र, संविधानातून झालेल्या परिवर्तनामुळे आज परिस्थिती बदलली आहे. बाबासाहेबांचे संविधान नसते तर चहा विकणारा आज पंतप्रधान झाला नसता.

देशात राजकारण निवडणुकीपुरते असते, त्यानंतर सर्वच घटक एकत्रितपणे सामाजिक विकासासाठी पुढे येतात. हे परिवर्तन संविधानामुळे झाले आहे.

बाबासाहेबांच्या संविधानामुळेच देश एकसंघ आहे. संविधानामुळे देश अबाधित आहे. त्यांचे कोणी तुकडे करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही, असा ईशारा देत ना.आठवले म्हणाले, अन्यायाविरोधात सर्व समाजाने उभे राहिले पाहिजे.

बाबासाहेब केवळ दलितांचेच नव्हे तर सार्‍या देशाचे उधारक होते. सिंचनाशिवाय देशाचा विकास शक्य नाही, म्हणून देशभरातील नद्या जोडल्या पाहिजे, त्यातून वीजनिर्मितीही वाढेल अशी भुमिका सर्वप्रथम बाळासाहेबांनीच मांडली होती.

ते कोणत्याही समाजाविरोधात नव्हते जगानेही त्यांची दखल घेतली आहे. अजून काही वर्ष ते राहिले असते तर आता देशाचे राजकारण वेगळे राहिले असते.

शहाद्यात पुर्णाकृती पुतळा झाला आहे, आता आपलीही मने पुर्णाकृती करतांना सामाजिक विकासात पुढे येउन शहराच्या विकासासाठी सवार्ंनी एकत्रित काम करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

नोटाबंदीचे समर्थन करीत ना.आठवले म्हणाले, सरकार कोणाचाही विरोधात नाही, काळा पैशाला लगाम लावणे व भ्रष्टाचारावर चाप बसविणे हा मुळ हेतू होता.

सामाजिक ऐक्य टिकविण्यासाठी प्रत्येक घटकांचा आर्थिक व सामाजिक विकास करण्यासाठी आमचे सरकार काम करीत असून शहर व तालुक्याच्या विकासाच्या योजनांसाठी संपुर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

आ.उदेसिंग पाडवी मतदारसंघातील विकासासाठी 5 कोटी निधीची मागणी ना. आठवले यांच्याकडे करीत त्यांनी आमदार निधीतून पुतळा छतासाठी 10 लाखांचा निधी जाहीर केले.

सातपुडा कारखाना चेअरमन दीपक पाटील यांनी शांततेचे शहर असलेल्या शहाद्यात काही घटनांमुळे डाग लागला आहे. मात्र बाबासाहेबाच्या कार्यकर्तृत्वातून सर्वांना ऐक्याची प्रेरणा मिळेल व शहराची वाटचाल पुन्हा शातंतेच्या मार्गावर येईल असा विश्वास व्यक्त केला.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकातून आरपीआय जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर यांनी बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी सर्वांनीच मदतीचा हात दिल्याने सामाजिक ऐक्याची भावना वृद्धींगत होऊन त्यांची प्रेरणा शहराच्या एक्यासाठी मोलाची ठरणार आहे, असे सांगितले.

सुत्रसंचलन किरण मोहिते यांनी केले. यावेळी रिपाइचे तालुकाध्यक्ष अनिल कुवर, माजी नगरसेवक दादा जगदेव, सुरेंद्र कुवर, मोहन शेवाळे, मुनेश जगदेव, शशिकांत कुवर, नरेंद्र महिरे, अशोक कुवर, चुनिलाल ब्राम्हणे, नरेंद्र कुवर, सुनिल गायकवाड, सुनिल शिरसाठ, पप्पु पाटोळे, महेंद्र कुवर, किरण मोघे, शांतीलाल कुवर आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शहादा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सामाजिक न्याय मंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपस्थित आ.उदेसिंग पाडवी, सातपुडा कारखाना चेअरमन दीपक पाटील, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, बापुजी जगदेव, आरपीआय अध्यक्ष अरविंद कुवर, सभापती आत्माराम बागले, पी.आर. पाटील, सेनेचे माजी जिल्हाप्रमुख अरूण चौधरी, बाबुराव कदम, संजय कदम, संजय पगारे, शशिकांत वाघ आदी.

 

 

 

LEAVE A REPLY

*