अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना शासनातर्फे भरपाई

0
मोदलपाडा ता.तळोदा । दि.11 । वार्ताहर-तळोदा तालुक्यात अतिवृष्टी होवून पुरात वाहून गेलेल्या मयताच्या वारसांना व मयत जनावरांच्या पशुमालकांना शासनातर्फे नैसर्गिक आपत्ती सहाय्यक अनुदान संबधित वारसांच्या बँकेत जमा करून अनुदानपत्र आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
येथील तहसील कार्यालयात शासनाचे नैसर्गिक आपत्ती सहायक अनुदानपत्र आ.उदेसिंग पाडवी यांच्या हस्ते वाटप झाले. तळोदा तालुक्यात दि.3 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत नदीच्या पुरात मोड येथील राजू विरसिंग ठाकरे हा पुरात वाहून मयत झाला.

त्याचे वारस आई सखुबाई विरसिंग ठाकरे यांना चार लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यात आलेले पत्र देण्यात आले. तळोदा येथील डि.बी. हट्टीतील बच्चू नूरबा पाडवी यांची बैल जोडी खर्डी नदीच्या पुरात वाहून मरण पावली.

पशुमालकास 50 हजार रूपये आपत्ती अनुदान नुकसान भरपाई वाटप करण्यात आली. तर्‍हावद पुनर्वसन येथील कुरश्या कागडा पाडवी यांच्या एक घोडा मयत पुरात वाहून मरण पावला.

नुकसान म्हणून 25 हजार रुपयांची आर्थिक मदत बँक खात्यात वर्ग करण्यात आली.यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत, भाजपा अनुसूचित जाती भाजपा आघाडीचे प्रदेश सदस्य डॉ.स्वप्नील बैसाणे, भाजपा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.रामराव आघाडे, कृ.उ.बा.समिती संचालक कालूसिंग वळवी, तलाठी अरविंद पाटील आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*