मोड येथे फरशीपुलाचा भराव खचल्याने वाहनांना अपघात

0
बोरद ता.तळोदा । दि.11 । वार्ताहर-मोड गावात तयार करण्यात आलेल्या फरशीपुलावरील मातीचा भराव खचल्याने वाहने रुतून पडून अपघात होत आहेत. तात्काळ रस्त्यावर योग्य तो भराव करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी व प्रवाश्यानी केली आहे.
तळोदा पासून 12 की.मी. अंतरावर असलेल्या मोड या गावात बोरदकडे जाणार्‍या रस्त्यालगत फरशी पूल तयार करण्यात आला आहे.
सदर फरशीपुल तयार करताना पुलाच्या अवतीभवती कच्चा मातीचा भराव करण्यात आला होता. मात्र, एका पावसाळ्यातच भराव खचून खड्डे निर्माण झाली आहेत.

या खड्यामध्ये पाणी साचल्याने रस्त्यावर चिखल निर्माण झाला आहे. यामुळे वाहने स्लिप होऊन अपघात घडत आहेत. तर खचलेल्या भरावामुळे वाहने रुतून पडत आहेत.

मागील 4 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीनाल्यांना पूर आला आहे. यामुळे शहादा प्रकाशाकडे जाणारा सदगव्हाण रस्ता बंद पडल्याने लहान मोठी सर्वच वाहने मोड मार्गे वळविण्यात आली आहे.

शहादा प्रकाशाकडे जाणारा तर्‍हावद व मोडमार्गे बोरद हे एवढेच मार्गच असल्याने वाहनांची वर्दळ या परिसरात वाढली आहे.

सदर रस्त्यावर ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे योग्य तो भराव न झाल्याने वाहने रुतून पडत असल्याच्या ग्रामस्थांकडून आरोप करण्यात येत आहे.

ठिकठिकाणी भराव खचल्याने लहान चारचाकी वाहनांचे बोनेट टेकले जात असून वाहने मध्येच रुतून पडत आहे.
गावकर्‍यांच्या मदतीने अडकलेली वाहने काढावी लागत असल्याने प्रवाश्यांची चांगलीच फजिती होत आहे.

तसेच फरशी पुलाच्या खाली वाहने पडल्यास मोठा अनर्थ होऊन प्रवाश्यांच्या जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुरुवारी याच परिसरात माल वाहतूक ट्रक अडकल्याची घटना घडली होती.

ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक काढावा लागला होता. सातत्याने होणार्‍या अपघातांवर मार्ग काढावा खचलेल्या जागी मातीचा भराव करावा, अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*