कुणबी पाटील युवा मंचतर्फे पुरस्कार वितरण सोहळा

0
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-कुणबी पाटील युवा मंचतर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाही समाजरत्न समाजभुषण, बळीराजा व विविध पुरस्कार वितरण सोहळा तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ,सेवानिवृत्तांचा सत्कार, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कुणबी पाटील समाजातील ज्या विद्यार्थ्यांना सन 2016-17 या वर्षात इ. 10 वीमध्ये 75 टक्के पेक्षा जास्त इ. 12 वीत 70 टक्के पेक्षा जास्त मार्कस ज्या विद्यार्थ्यांना असतील त्यांनी आपली नावे व प्रमाणपत्राच्या झेरॉक्स तात्काळ नोंदवावीत.
सन 2016 व 17 या वर्षात शैक्षणिक, क्रिडा व सांस्कृतीक, साहित्यिक, कला क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनिय यश मिळविणार्‍या समाजरत्न, समाजभुषण, आदर्श शिक्षक पुूरस्कर देवून गौरविण्यात येणार आहे.

सन 2016-17 या वर्षात जे समाजाचे व्यक्ती सेवानिवृत्त झाले असतील त्यांनीही आपली नावे खालील पत्यावर आपली माहिती नोंदवावी त्याचप्रमाणे ज्या शेतकर्‍यांनी शेतीमध्ये विविध संशोधन करून प्रयोगिक पध्दतीने शेतीमध्ये उत्पन्नाचे प्रमाण वाढविले आहे.

अशा शेतकरी बांधवांना बळीराजा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सांस्कृतीक कार्यक्रमाला समूह नृत्यात भाग घ्यावयाचा असेल त्यांनी संपर्क साधून नावे नोंदवावे.

या विविध पुरस्कारासाठी प्रस्तावनाचा नमुना भरून मुदतीच्या आत सादर करावा. या पुरस्कारांसाठी समितीतर्फे योग्य व्यक्तींची निवड केली जाईल.

पात्र विद्यार्थ्यांनी आपली नावे गुणपत्रकासह व पुरस्कारासाठी प्रस्ताव दि.25 जुलैपर्यंत दिनेश पाटील, कैलास पाटील, प्रदीप देसले, रविंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील यांच्याकडे जमा करावे, असेे आवाहन करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*