रावळापाणी ते मुंबई जागर यात्रेचे आयोजन

0
नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-31 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रसेवा दलाने नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी ते मुंबई अशी जागरयात्रा आयोजित केली आहे.
1942 चा नागरीकांपर्यंत पोहचवणे. समाजवादी इतिहास जनतेसमोर पोहचवणे, विविध संस्था, संघटनांना जोडणे आदी उद्देश या यात्रेचे आहेत.
नंदुरबार शहरात यात्रा दि.31 जुलै रोजी येणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
शहीद स्मृती, युवारंग, लोकमान्य टिळक वाचनालय आदीसह पी.के.पाटील प्रतिष्ठान या विविध संघटना या कार्यक्रमाचे आयोजन संयोजन करणार आहे.

त्यानिमित्त लोकमान्य टिळक वाचनालयात नियोजन करण्यासाठी सभेचे आयोजन डॉ.पितांबर सरोदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी किर्तीकुमार सोलंकी, निंबाजीराव बागुल, राजुभाई सोमाणी, मुन्नाभाई पटेल, डॉ.सरीता पटेल, पांडुरंग माळी, गोविंद अग्रवाल, प्रा.निळकंठेश्वर धनराळे, राहुल शिंदे, जितेंद्र लोके, बाळुभाई पटेल आदी विविध संस्थांचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

दि.31 जुलै, ऑगस्ट क्रांती यात्रा व सप्टेंबर शहिद दिन अभिवादन सोहळा आयोजनाच्या संदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी व विविध संस्था संघटनांची व्यापक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती शहीद स्मृती मंडळातर्फे देण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*