विद्यार्थी खूनप्रकरणी दोघांचा जामिन मंजूर

0
नंदुरबार । प्रतिनिधी-येथे झालेल्या अल्पवयीन विद्यार्थी राज नंदकिशोर ठाकरे याच्या खूनप्रकरणी काल पोलीसांनी अटक केलेल्या दोन अल्पवयीन संशयीतांना 25 हजाराचा वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन अर्ज मंजूर झाला आहे. मात्र, कागदपत्रांची पुर्तता झाली नसल्याने त्यांना धुळे येथील बालसुधार गृहात पाठवण्यात आले आहे.
येथील राज नंदकिशोर ठाकरे नेहमीप्रमाणे दि.7 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता शाळेत गेला होता. दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास त्याचे मित्र त्याचा पाठलाग करत शाळेत गेले त्याने शाळेत सायकल लावल्यानंतर त्याला शाळेच्या बाहेर बोलावून तुझ्या मामाच्या मुलाचा अपघात झाला आहे. असे सांगून त्याला मॅस्ट्रो दुचाकीवर बसवून तिघेजण घेवून गेले.

खामगांव- नंदुरबार या रस्त्यावर लघवी करण्याच्या बहाण्याने ते थांबले व राजकडून त्यांनीर घराची चावी घेतली व त्याला चाकूने भोसकले तो खाली पडल्यावर त्याच्या गळयावर चाकूने सपासप वार करून त्याचा खून केला.

याप्रकरणी दोघा अल्पवयीन संशयितांविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा तसेच भादंवि 302 प्रमाणे खूनाचा व भादंवि 454 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी तातडीने पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे व अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश पवार, स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक गिरीश पाटील, शहर पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक साटोटे यांनी तातडीने तपास चक्र फिरवून अवघ्या 24 तासात संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून 71 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने तसेच साडे पाच हजार रुपये रोख, चाकू हस्तगत करण्यात आले होते. काल दोघांना बालन्यायालयात हजर केले असता, न्या.गायकवाड यांनी 25 हजाराच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामिन अर्ज मंजूर केला आहे.

कागदपत्रांची पूर्तता बाकी असल्याने त्यांना धुळे येथील बालसुधारगृहात रवाना करण्यात आले आहे. संशयित आरोपींतर्फे अ‍ॅड.मौसम चौधरी यांनी काम पाहिले.

 

LEAVE A REPLY

*