लाच मागितल्याप्रकरणी पोलिसाला अटक

0
नंदुरबार । प्रतिनिधी-गुन्ह्यात मदत करण्यासाठी एकाकडून पाच हजार रूपयाची मागणी केल्याप्रकरणी धडगांव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईकाला पुराव्यासह पकडण्यात आले.
धडगांव पोलीस ठाण्यातील एका दारूबंदी कायद्यातंर्गत शिक्षा झालेल्या आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी तपासी अंमलदार पोलीस नाईक दिलीप भिमसिंग तडवी याने पाच हजार रूपयाची लाच मागितली.

याबाबतचे सर्व पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांना प्राप्त झाल्याने त्याला आज सकाळी अटक करण्यात आली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी धडगांव पोलीस ठाण्यात पोलीस नाईक दिलीप तडवी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*