जयनगर येथे संत दगाजी बापूसह रामदेव बाबा मंदिराचे भूमिपूजन

0
कोंढावळ । वार्ताहर-शहादा तालुक्यातील जयनगर येथे संत दगा बापू व रामदेव बाबा यांच्या मंदिराचे भूमिपूजन शहादा पंचायत समिती सदस्या सौ.शिलाबाई दगडू पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
जयनगर हे गांव श्री हेरंब गणेशाच्या कृपेने तीर्थक्षेत्र म्हणून नावारुपास येत आहे वर्षातून 2 ते 3 वेळा संकष्टी चतुर्थिला येथे भव्य यात्रा भरत असते भाविक गुजरात, मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातुन हजारो भाविक या यात्रेत हेरंब गणेशयाच्या दर्शनला येत असतात.

महाराष्ट्रात जयनगर दूसरे ठिकाण मानले जाते तसेच शिव पार्वती मंदिर जागृत हनुमान मंदिर, महानुभव चक्रधर स्वामी मंदिर, भवानी मंदिर शेजारी आई सप्तश्रगी मातेचे मंदिर त्यातच हे रामदेव बाबा व दगा बापुचे मंदिर यामुळे जयनगर गावाचा सौदर्याने अजुनच भर पडणार आहे आणी जयनगर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत आणि अश्या आध्यत्मिक कामास आम्ही कटिबध्द आहोत असे सौ.शिलाबाई यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

यावेळी कार्यक्रमास सरपंच बायजाबाई जगन पारधी, उपसरपंच संदिप खलाने, ट्रस्टचे अध्यक्ष सदगिर गोसावी, उपाध्यक्ष कैलास खलाने, माजी व्हा.चेरमन खरेदी विक्री संघ ईश्वर राजाराम माळी, उपसरपंच ग्रा.पं. निंबोरा कांताबाई पाटिल, सा.कार्यकर्ता किशोर पाटिल, सुनील महाराज जोशी, जेष्ठ नागरिक अभिमन माळी आदी ग्रामस्थ व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*