तळोदा तालुक्यातील 95 शेतकर्‍यांना अवजारे वाटप

0
मोड ता.तळोदा । दि.10 । वार्ताहर-महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागातंर्गत उन्नत शेती समृध्द शेतकरी योजनेतंर्गत तळोदा तालुक्यातील शेतकर्‍यांकडून सन 2017-18 या आर्थिक वर्षात ट्रॅक्टर लहान मोठे, स्वयंचलित यंत्रे ट्रॅक्टर किंवा पावर ट्रिलर चलित यंत्रे मिनाराईस मिल, मिनीदालमील, पॅकींग मशिन आदीसाठी लाभार्थी निवडीसाठी अर्जप्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यात लहान मोठे ट्रॅक्टरसाठी 110 शेतकर्‍यांनी अर्ज केले होते. इतर औजरांसाठी 95 शेतकर्‍यांनी विहित मुदतीत अर्ज सादर केले होते.
अशा शेतकर्‍यांना शासनस्तरावरून विविध योजनेतंर्गत मिळणार्‍या निधीतून अनुदानाचे वाटप सुरळीत करता यावे यासाठी सोडत पध्दतीने शेतकर्‍यांचा उपस्थितीत प्रतिक्षा यादी तयार करण्यासाठी तालुका कृषी अधिकार्‍यांचा दालनात सोडत काढण्यात आली.

या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी उपविभागीय कृषी अधिकारी रामोळे, गटविकास अधिकारी शरद मगर, नायब तहसिलदार रामजी राठोड, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, कृषी अधिकारी अनिल गावीत, महाजन, तालुका कृषी विभागाचे कृषी सहाय्यक कृषी विभागाचे कर्मचारी तसेच तालुक्यातील विविध गावातून अर्ज केलेले शेतकरी उपस्थित होते.

लहान मुलीचा हाताने सुरूवातीला ट्रॅक्टर सोडत काढण्यात आली. त्यात प्रतापपूर येथील शेतकर्‍यांचा नावाची चिठ्ठी निघाली अशा प्रकारे प्रतिक्षा यादी सोडत काढतांना एक ते 110 क्रमांकासाठी प्रतिक्षा यादी तयार करण्यात आली तसेच यांत्रिकी कारणासाठीही 1 ते 95 क्रमांकाची यादी तयार करण्यासाठी असूनही कार्यालयात माहितीस्तव उपलब्ध असेन असे सांगितले.

उपविभागीय कृषी अधिकारी रामोळे यांनी कृषी विभागातंर्गत राबविल्या गेलेल्या योजनांसाठी लाभार्थी निवड करतांना काही शेतकर्‍यांवर खरोखरच अन्याय होत असल्याचा तक्रारीवरून शासनाने पारदर्शक पध्दतीने योजना लोकांसमोर या वर्षापासून सोडत पध्दतीने लाभार्थींची निवड करण्यात येईल.

यासाठी प्रत्क्षिा यादीसाठी सोडत काढली जात आहे. असे सांगितले. विविध योजनांसाठी अनेक अर्ज करणार्‍या शेतकर्‍यांना एक योजनेचा लाभ या आर्थिक वर्षात दिला जाईल. योजना निवडीचे स्वातंत्र्य संबंधित अर्जदाराला राहणार आहे.

काही शेतकर्‍यांनी तळोदा तालुका कृषी विभागाने सन 2015-16आणि सन 2016-17 या दोन वर्षात राबविलेली ट्रॅक्टर लाभार्थी निवडीची प्रक्रिया संशयास्पद असल्याची तक्रार शेतकर्‍यांनी बैठकीत उपविभागीय अधिकार्‍यांकडे केल्यामुळे सोडत पध्दतीने केलेल्या प्रतिक्षा यादीनुसारच राबविली जाईल का? येणार्‍या काळातच स्पष्ट होईल.

शासनाकडून तळोदा तालुक्यासाठी अद्याप उद्दिष्ट आलेले नसल्याने या आर्थिक वर्षात किती शेतकर्‍यांना लाभ मिळेल हे येणार्‍या काळात स्पष्ट होईल.

सोडतीसाठी प्रतापूर, मोड, कढेल, खेडल्े, तर्‍हावद, मोहिदा, रांझणी, चिनोदा, तळवे, आमलाड, राजविहिर, सोमावल, मोलदपाडा, धवळीविहिर आदी गावातील शेतकरी हजर होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी कार्यालयाचा कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

 

LEAVE A REPLY

*