वनरक्षकास मारहाण: 12 जणांविरूद्ध गुन्हा

0
नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-शहादा तालुक्यातील वडगांव येथे वनजमीनीवरील अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून वनरक्षकास सहा जणांसह 12 जणांनी मारहाण केली.
तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शहादा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वनरक्षक गुलाबसिंग रामा वसावे रा.बिजरीपोटी पो.मोलगी ता.अक्कलकुवा ह.मु.वडगांव ता.शहादा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वनजमिनीवरील अतिक्रमण काढल्याच्या कारणावरून बिवा धुरसिंग पावरा, सुरज धुरसिंग पावरा, दिनेश जंगल्या पावरा सर्व रा.कोढपांढरी ता.शहादा, हिरालाल लिंबा ठाकरे, प्रेमसिंग पानसिंग पावरा रा.शहाणा, संजय मकड्या पावरा रा.वडगांव यांच्यासोबत अनोळखी 5 ते 6 ईसम यांनी वडगांव येथील शासकीय कार्यालयात गैर कायद्याची मंडळी जमवून अनधिकृतपणे प्रवेश केला व गुलाबसिंग वसावे यास वाईट शिवीगाळ करून लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली.

तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी 12 जणांविरूद्ध शहादा पोलीस ठाण्यात भादवि कलम 353, 332, 143, 147, 452, 504, 506, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*