खबरदार ..! गावात दारु विक्री कराल तर …!!

0

मोदलपाडा / तळोदा तालुक्यातील सिलींगपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात दारूबंदीचा ठराव पारीत करण्यात आला.

दारूविक्री विरोधात महिलांनी कडक पवित्रा घेतला.

या मागणीची दखल घेत ग्रामपंचायतीने गावात दारू गाळप करणार्‍यांना वीस हजाराचा दंड व रंगेहाथ पकडून देणार्‍यास दोन हजार एकावन्न रूपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.

तळोद तालुक्यातील जूने सिलींगपूर व नवे सिलींगपूर अशा दोन्ही संयुक्तीक गावांच्या ग्रामपंचायतींच्या झालेल्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला.

यावेळी गावातील महिलांनी दारूमुळे गावात अनेक तरूणांचा बळी गेला आहे. अनेकांच्या संसाराची राखरांगोळी झाली आहे.

व्यसनाधिन लोकांमुळे गावात भांडणतंटा होत असतो. परिणामी गावाच्या विकासाच खिळ बसली आहे. आदी महत्वपूर्ण मुद्दे पटवून दिले.

ग्रामसभेत उपस्थित महिलांनी दारूबंदी संदर्भात ठोस निर्णय व्हावा, अशी मागणी लावून धरली. दोन्ही गावात संपूर्ण दारूबंदी व्हावी, अशी जोरदार मागणी जुने सिलींगपूर व नवे सिलींगपुर अशा दोन्ही गावातील महिलांनी केली.

महिलांनी उचललेल्या या कडक पवित्र्याची दखल घेत ग्रामपंचायतीने गावात दारूबंदी व्हायची असेल तर कडक धोरण अवलंबिले पाहिजे, असा निर्णय घेतला.

दारू गाळप करणार्‍या 20 हजार रूपयांचा दंड आकारण्याचे ठरविले तर दारू गाळप करणार्‍याला जो रंगेहाथ पकडून देईल त्यास दोन हजार एकावन्न रूपयांचे बक्षिस ग्रामसभेत जाहीर करण्यात आले आहे.

दारूबंदी विरोधातील ठराव सर्वानुमते समत करण्यात आला.

LEAVE A REPLY

*