आयशरला अपघात एकाचा मृत्यू, एक जखमी

0
नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-अक्कलकुवा तालुक्यातील अंकलेश्वर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील नवापाडा गावाच्या पुलाजवळ आयशरला अपघात झाल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.
पुनम जयसिंग राजपूत रा.नाचवेत ता.कन्नड जि.औरंगाबाद याने दिलेल्या फिर्यादीनुसार, पप्पू ढगे रा.पिरोस ता.कन्नड, जि.औरंगाबाद याने आपल्या ताब्यातील आयशर (क्र.एम.एच.20, जी.ई. 5275) हे वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरघाव वेगाने व हयगयीने चालवून त्याचा अपघात घडवून आणला.

या अपघातात सचिन पंडीत धुमाळ (वय 25) रा.कोपरचेल ता.कन्नड, जि.औरंगाबाद याचा मृत्यू झाला तर पुनम जयसिंग राजपूत हा जखमी झाला.

याप्रकरणी वाहनचालक पप्पू ढगे याच्याविरूद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

LEAVE A REPLY

*