आष्टे येथील मनोज युवा फाऊंडेशनतर्फे कृषी दिवस साजरा

0
नंदुरबार । प्रतिनिधी-तालुक्यातील आष्टे येथील मनोज युवा फाऊंडेशनतर्फे कृषी दिवस साजरा करण्यात आला. शेताच्या बांधावर तसेच पडीत जागेवर वृक्षारोपण करण्यात आला.
यावेळी प्रा.मनोज शेवाळी यांनी प्रत्यक्ष शेतात जावून शेतकर्‍यांशी, शेतमजूरांशी संवाद साधून झाडांचे महत्व पटवून दिले. शेताच्या बांधावर फळझाडे लावून उत्पादनही घेता येईल आणि पर्यावरण समतोल राखता येईल असे प्रा.शेवाळे यांनी सांगितले.

याचबरोबर वरिष्ठ शेतकर्‍यांच्या हस्ते उत्कृष्ट आधुनिक शेती करणार्‍या नवयुवक शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला. वृक्षारोपण करणे आणि झाडे वाचविणे हे शेतमजूरांनाही गरजेचे वाटेल लागले आहे असे शेतकरी व शेतमजूरांच्या चर्चेतून दिसून आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश खैरनार, पंकज पाटील, संजय शेवाळे, ज्ञानेश्वर शेवाळे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे ग्रामस्थ व परिसरातील नागरीकांनीही वृक्षारोपण करण्याचा निर्धार केला आहे.

 

LEAVE A REPLY

*