हातपंपावर पाणी भरण्यावरुन महिलेची हत्त्या

0
नंदुरबार । दि.29 । प्रतिनिधी-शहादा तालुक्यातील मडकाणी येथे हातपंपावर पाणी भरण्याच्या वादातून एकाने लाकडी डेंगार्‍याने मारहाण करून महिलेची हत्या केल्याची घटना घडली.
याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात एकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येवून अटक केली आहे.

याबाबत संतोष उखा वळवी रा.मडकाणी ता.शहादा याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मडकाणी गावातील कालुसिंग नारसिंग पाडवी यांच्या घरासमोरून सरकारी हातपंपावर यमाबाई उखा वळवी (वय 55) ही पाणी भरण्यासाठी गेली असता मोग्या धडा चौधरी याने तिला पाणी भरण्यास मज्जाव केला.

तसेच तिच्या डोक्यावर लाकडी डेंगार्‍याने मारहाण करून गंभीर जखमी केले. तिला जखमी अवस्थेत उपचारासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.

परंतु जखम गंभीर असल्याने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले व त्यानंतर धुळे येथील हिरे मेडीकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले.

परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोग्या चौधरी याच्याविरूद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*