नंदुरबार येथे १ जुलैपासून दिव्यांग नोंदणी अभियान

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  दिव्यांगाच्या सहाय्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुगम्य भारत अभियानासह विविध उपाययोजना सुरु आहेत.

त्याच योजनेचा भाग म्हणुन धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांगाकरीता सहायक उपकरणे व अनुज्ञेय साहित्य उपलब्ध करुन देण्यासाठी दिव्यांग नोंदणी विशेष अभियान राबविण्याबाबत वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, यांनी जिल्हा प्रशासनास कळविले आहे

त्यानुसार १ ते ३१ जुलै दरम्यान प्रशासन व सामाजिक संघटनांमार्फत दिव्यांग विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोंदणी अभियानाच्या नियोजनार्थ नुकतीच बैठक घेण्यात आली.

या बैठकीस गिरीष महाजन यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शरद काळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, सुरेश पाडवी, विजय कासार, वासुदेव महाजन, गिरीष बडगुजर, गणेश चित्ते, रामेश्वर नाईक,आदी उपस्थित होते.

बैठकीदरम्यान दिव्यांग विशेष नोंदणी अभियान जिल्ह्यातील गावागावात राबविणेबाबत तसेच कुठलाही दिव्यांग सदर अभियानापासून वंचित राहणार नाही, यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना दिल्या.

या दिव्यांग नोंदणी अभियानात नोंद होणार्‍या पात्र लाभार्थ्याना केंद्र शासन व सी.एस.आर. च्या माध्यमातून अनुज्ञेय उपकरणे विनामुल्य वाटपाचे भव्य शिबीर सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान घेण्यात येईल असे आयोजकांमार्फत सांगण्यात आले.

यासाठी आपल्या तालुक्याच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दिव्यांगानी आपले नाव नोंद करावी, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले.

LEAVE A REPLY

*