शासकीय रुग्णालयात १ ते ३ दरम्यान दंतचिकित्सा

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या विभागामार्फत नंदुरबार येथे जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच प्रत्येक तालुका शासकीय रुग्णालयात १ जुलै ते ३ जुलै २०१७ रोजी विनामुल्य दंतचिकीत्सा शिबीर आयोजीत करण्यात येत आहे.

तालुकानिहाय तज्ञ डॉक्टरांच्या चमुसहीत स्वतंत्र डेंटल व्हॅन प्रत्येक तालुक्यात संपुर्ण उपकरणासह रुग्णसेवेसाठी तीन दिवस उपस्थित राहणार आहेत.

या डॉक्टर चमूत शासकीय दंत महाविद्यालय, मुंबई, नागपुर, औरंगाबाद, नाशिक, संगमनेर, आदी दंत महाविद्यालय येथिल तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. या शिबीरात दातांची कवळी बसविणे, दात काढणे, रुट कॅनल, ओरल कॅन्सर स्क्रिनिंग, दांतावर आजार निहाय योग्य ती शस्त्रक्रिया करणे, दातांना साफ करुन चांदी किंवा तत्सम प्रकारचे वस्तु भरणे याप्रकारची सेवा देण्यात येणार आहे.

३० एप्रिल २०१७ रोजी वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आयोजीत केलेल्या सातपुडा भव्य विनामुल्य महाआरोग्य शिबीराअंतर्गत तालुकानिहाय तज्ञ डॉक्टरांकडुन वेगवेगळया प्रकारच्या शस्त्रक्रिया शिबीरांचे आयोजन करण्यात आले.

त्यानुसार गरजू रुग्णांना शस्त्र क्रियेचा लाभ होत आहे. तसेच मोठ्या शस्त्रक्रियांशी संबधित रुग्णांना धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय व खाजगी रुग्णालयात संदर्भित करण्यात येत आहेत. यातील दुसरा टप्या अंतर्गत खाजगी रुग्णालये निरामय हॉस्पीटल, सिध्देश्वर हॉस्पीटल, देवरे हॉस्पीटल, सुधा हॉस्पीटल व युरोलॉजी सेंटर,धुळे या रुग्णालयांव्दारे रुग्णांना मोफत सेवा पुरविण्यात येत आहे.

यासाठी शस्त्रक्रिया लाभार्थी रुग्णांनी आपापले नांव संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आपल्या तालुका रुग्णालयात नोंदवावा असे आवाहन शिबीर आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*