नंदूरबार जिल्ह्यात योगदिनी योगासनांचे प्रदर्शन

0
नंदुरबार | प्रतिनिधी : जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त विविध शाळा, संस्था, शासकीय कार्यालयांतर्फे योगासनाचे आयोजन करण्यात आले होते. विश्‍व योगदिन संयोजन समितीतर्फे आज सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हजारो योगप्रेमींनी योगासने करून योगदिन साजरा केला.
डी.आर. हायस्कूल

येथील नंदुरबार एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती दुर्गाबाई रघवंशी हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालयात विश्‍व योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्राचार्य जी.एस. हिवरे, उपप्राचार्य एस.व्ही. चौधरी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थीनी, योग खेळाडू, एनएसएस स्वयंसेवक, एनसीसी कॅडेट, स्काऊट विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत विश्‍व योग दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने योगाचे महत्व, संकल्प, मंत्र स्पष्ट करण्यात आले.

शासकीय नियमाप्रमाणे योग, योगासने, सुक्ष्म व्यायाम, प्राणायमची आवर्तने करण्यात आली. कार्यक्र्रमाचे संचलन क्रीडा शिक्षक प्रा.नितीन कबाडे व श्रीराम मोडक यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.डॉ.उमेश शिंदे, पी.बी. जानी, निलेश गावीत, जगदीश बच्छाव, प्रा.संजय पाटील या सहकारी शिक्षकांनी केले.

नवजीवन विद्यालय, वाघाळे

तालुक्यातील वाघाळे येथील नवजीवन विद्यालयात योगदिन साजरा करण्यात आला.
मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली योगशिक्षक एस.के. रघुवंशी यांनी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांकडून प्राणायमाचे प्रात्यक्षिके करवून घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.

पी.एम.सी. विद्यालय, बामखेडा

आतंरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शहादा तालुक्यातील बामखेडा त.त. येथील पी.एम.सी.माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच अ.सु.पटेल प्राथमिक विद्यालय या शाळेच्या आवारात सर्व विद्यार्थी-विद्यार्थींनी व शिक्षक-शिकक्षेत्तर कर्मचारी आदिनी एकत्रीत येवून योग दिवस साजरा केला.

यावेळी योग कसा करवा व योगाचे महत्व काय तसेच विद्यार्थ्यांनी नेहमीत योग करवा असे मार्गदर्शन या प्रसंगी पी.एम.सी विद्यालयाचे प्रा.पी.सी.पटेल यांनी विद्यार्थ्यींसमोर आपले मनोगतातून व्यक्त केले. तसेच योगाचे महत्व पटवून सांगितले.

यावेळी योग प्रशिक्षक पी.एस.पाटील, ए.बी. चौधरी, आर.एस. चौधरी, प्रा.पी.सी. पटेल, पर्यवेक्षक व्ही.आर. पटेल, अ.सु.पटेलचे मुख्याध्यापक यु.एम. चौधरी, ए.डी.जगताप उपस्थित होते.

एकलव्य विद्यालय

एकलव्य विद्यालयात आज तिसरा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा झाला. विद्यार्थ्यांसह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी विविध योगासने केली.

विद्यालयाचे योग शिक्षक श्री सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही योगासने करण्यात आली. कार्यक्रमाला प.खा. भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.सुहासिनी नटावदकर, उपमुख्याध्यापक एच.एच. खैरनार, पर्यवेक्षक ए.एन. पाटील, एन.सी.सी. ऑफिसर व्ही.एस. वाघ, डॉ.विजय चौधरी, राहुल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*