‘देशदूत’तर्फे आयोजित ‘सचिनःए बिलियन ड्रिम्स’ चित्रपटाला उदंड प्रतिसाद

0
नंदुरबार | प्रतिनिधी :  येथील ‘देशदूत’तर्फे आयोजित ‘सचिनःए बिलीयम ड्रिम्स’ या चित्रपटाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला.
 चित्रपटाच्या या शो चे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रत्नाताई रघुवंशी उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, नगरसेविका सौ.भारतीताई राजपूत, लायन्स क्लबचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, युवक कॉंग्रेस नंदुरबार विधानसभा क्षेत्र अध्यक्ष मोहितसिंग राजपूत, तसेच धुळे येथील राष्ट्रमाता जिजाऊ सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय भामरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पाचशेवर विद्यार्थ्यांनी चित्रपटाचा लाभ घेतला. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी देशदूतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतूक करुन शुभेच्छा दिल्या. तसेच मान्यवरांनी सचिन चित्रपटाचा लाभही घेतली.
यावेळी देशदूतचे व्यवस्थापक सुनील बहाळकर, मुख्य उपसंपादक राकेश कलाल, जाहिरात व्यवस्थापक कैलास सोनवणे, सुनील खेडकर, उपसंपादक शशिकांत घासकडबी, वितरण प्रतिनिधी संजय पाटील, डीटीपी विभागाचे विशाल पाठक, महेंद्र साबळे, ज्ञानेश्‍वर सोनवणे आदींनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुख्य उपसंपादक राकेश कलाल यांनी केले. प्रास्ताविक कैलास सोनवणे यांनी केले. मोहितसिंग राजपूत यांनीही यावेळी मनोगत व्यक्त करुन देशदूतच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

*