तळोद्यात अवैध गौणखनिज वाहतूक

0
नंदुरबार / अवैध गौण खनिज वाहतूककरणार्‍या 15 वाहनांकडून तीन लाखाचा दंड महसूल विभागाने वसुल केला आहे.
येथील तहसिलदार योगेश चंद्रे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.
गेल्या दोन वर्षापासून परिसरातून अवैधरित्या गौण खनिजचा उपसा व वाहतूक सुरु होती. परंतू महसूल विभागाचे वाळूूमाफीयांशी लागेबांधे असल्याने त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती.
मात्र, तहसिलदार चंद्रे यांनी पदभार स्विकारताच अवैध गौण खनिजची तस्करी रोखण्यासाठी विविध पथकांची नियुक्ती केली आहे.

यातील एका पथकाने बेकायदेशीरपणे गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर पाळत ठेवून सलग तीन दिवस कारवाई केली.

त्यात त्यांनी वाळू वाहतुक करणार्‍या 15 वाहनांवर कारवाई केली आहे. यात दोन डंपरचाही समावेश आहे.

याप्रकरणी वाहन चालक वेस्ता पावरा, सायसिंग पाडवी, कैलास चौधरी, मिथुन धानका, फिरंग्या वळवी, बारासिंग पावरा आदींकडून साधारण 2 लाख 96 हजार रूपयांची रॉयल्टी वसूल करण्यात आली आहे.

ही कारवाई तहसिलदार चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी बी.यु. कटारे, पी.एम. भिंगारे, पी.ए. अहिरे, सी.एन.सरगर, बी.के. वानखेडे, डी.बी. हांडे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

*