बुद्धीबळ स्पर्धेसाठी निवड चाचणी

0
नंदुरबार / भारतीय बुध्दीबळ संघटनतर्फे वेस्ट बंगाल येथे होणार्‍या रॅपिड अ‍ॅण्ड बिल्ट्स राष्ट्रीय अजिंक्यपद बुध्दिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या निवडीसाठी दि.11 जून रोजी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा अश्वमेघराज चेस क्लबमध्ये होणार आहे.
राज्य बुध्दिबळ संघटना व अवश्वमेघराज चेस क्लबतर्फे रॅपिड अ‍ॅण्ड बिल्ट्स मुला मुलींच्या जिल्हास्तरीय बुध्दिबळ निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. निवड चाचणी स्पर्धेत सहभागासाठी वयाची अट नाही.
स्पर्धेसाठी 8 खेळाडूंची निवड होणार आहे. त्यांना मुंबई येथे 17 व 18 जूनला होणार्‍या राज्यस्तरीय मानांकन अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहे.

मात्र इतर सर्व विजेत्या खेळाडूंना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. स्पर्धा दि.11 जूनला सकाळी 9 वाजता अश्वमेघराज चेस क्लबमध्ये होईल.

स्पर्धा स्विसलीग पध्दतीने व फिडेच्या नियमानुसार होणार आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, क्रीडा मंडळ, विविध क्रीडा संघटना, क्लब यातील खेळाडूंनी या निवड चाचणी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन बळवंत निकुंभ, प्रा.डॉ.ईश्वर धामणे, सॅबस्टीन जयकर, सचिव शोभराम खोंडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*