पळाशीत श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन

0
नंदुरबार |  प्रतिनिधी : पळाशी येथे पुरातन श्रीराम मंदिराच्या बांधकामाचे भूमिपुजन महामंडलेश्‍वर रामानंदपुरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.

पळाशी येथे १९८५ साली श्रीराम मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. आता श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान, संत दगाजी महाराज यांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे बांधकाम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरवर्षी जुने श्रीराम मंदिरात भागवत कथा, श्रीराम कथा यांचे आयोजन करण्यात येत असते. त्यासाठी भाविकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती असते.

दरम्यान आता श्रीराम मंदिराचे बांधकाम होणार असल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.

भूमिपुजन कार्यक्रमाला दत्तू पाटील, राजाराम पाटील, संतोष पाटील, सतीष पाटील, लोटन पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी नवयुवक मित्रमंडळातर्फे परिश्रम घेण्यात आले.

LEAVE A REPLY

*