मोठ्या भावाकडून लहान भावाचा खून

0
नंदुरबार / उसनवारीचे पैसे दिले नाहीत म्हणून मोठ्या भावाने सख्या लहान भावाचा खून केल्याची घटना धडगांव तालुक्यातील मोख खुर्द येथे घडली.
याबाबत वहार्‍या रुबजी वसावे रा.मोख खुर्द ता.धडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, हिंमत वहार्‍या वसावे (वय 30) याने आपला मोठा भाऊ जयवंत वहार्‍या वसावे याच्याकडून 3 हजार रुपये उसनवार घेतले होते.

ते त्याने परत केले नाहीत याचा राग आल्याने त्याने हिंमत वसावे याच्या पाठीवर व डोक्यावर कुर्‍हाडीने वार करून त्याची हत्या केली.

तसेच त्याला अडविण्यासाठी वहार्‍या रुबजी वसावे व पेरवीबाई हे दोघे गेले असता त्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी धडगांव पोलीस ठाण्यात जयवंत वसावेविरूद्ध भादवि कलम 302, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*