शेतकरी संपात आता कारभारणींचाही सहभाग : शहाद्यात महिलांनी केले रास्ता रोको

0
नंदुरबार | प्रतिनिधी : संपुर्ण कर्ज माफी झालीच पाहीजे, शेतीमालाला हमी भाव मिळालाच पाहीजे, ६० वर्षावरील शेतकर्‍यांना प्रति माह ३ हजार पेन्शन मिळालेच पाहीजे या सारख्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या संपात आता महिलांनीही उडी घेतली आहे.

शहादा येथे शेतकरी महिलांनी विविध घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केले.

या सरकारचे करायचे काय ? खाली डोके वर पाय, कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय यासारख्या विविध घोषणा या महिला शेतकर्‍यांनी दिल्यात.

दरम्यान पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

*