लोकसहभागातून विकास कामे करणे शक्य : तळोदा येथे आ.उदेसिंग पाडवी यांचे आमसभेत प्रतिपादन

0
मोदलपाडा ता. तळोदा | वार्ताहर :  लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व परिसरात लोकांचा सहभाग समन्वय व त्यांचा सहकार्यातुनच विकास कामे करणे शक्य आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या, प्रश्न् ,अडचणी, सुचना यावर चर्चा करण्यासाठी ही आमसभा आयोजित केली जात असते.यात गेल्या वर्षी राबवीलेल्या विकास कामांचा आढ़ावा घेतला जातो तर आगामी वर्षामध्ये केले जाणारे कामांचे नियोजन केले असते असे प्रतिपादन आ. उदेसिंग पाडवी यानी केले.

तळोदा येथील वामनराव बापूजी मंगल कार्यालय येथे पंचायत सम़ीतिची आमसभा आ.उदेसिंग पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

या वेळी तहसीलदार योगेश चंद्रे, पं. स. सभापती शांतीबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, गटविकास अधिकारी शरद मगर, पो.नि. वाघमारे, ए.पी.आय युवराज सैदाने, दिवाकर पवार, माजी सभापती आकाश वळवी, नंदू गोसावी, सुरेश इंद्रजीत, जयसिंग माळी, उपसरपंच राजेंद्र राजपूत, डॉ. स्वप्निल बैसाने, शिरीष माळी, आदि उपस्तित होते.

आ.पाडवी म्हणाले की विकासाची कामे करत असतांना शासकीय पातळीवर अनेक अडचनींचा सामना करावा लागत असतो मात्र सर्व विभागांचा समन्वय साधुन तालुक्याचा विकास रथ पुढे नेणे हे महत्वाचे असते.

एक एक विभागाच्या अधिकार्यानी आपला आढावा द्यायला सुरुवात केली असता आ.पाडवी म्हणाले की तुम्ही जनतेचे प्रश्न व समस्या कितपत सोडवले आहेत व का सोड्वल्या नसतील तर काय अडचणी आल्या हे फक्त थोडक्यात सांगा

यात विज वितरण विभागातील अधिकारयांना चांगलेच धारेवर धरण्यात आले होते. तलोदा तालुक्यातील बंधारा गावातील एका नागरिकाने आपल्या तक्रारित सांगितले की आमचा गावाला एक वर्षा पासून डी पी नसल्यामुळे आमचे संपूर्ण गाव अंधारात आहे असा मुद्दा मांडला असता आ.पाडवी यांनी सदर अधिकारयांना चांगलेच खड़े बोल सुनावले व त्या नागरिकाला आश्वासन दिले की लवकरच विद्युत विभागाचे कर्मचारी तुमच्या गावात येउन नवीन डी पी बसवून देतील.

पुढे आ.पाडवी म्हणाले की मी आमदार झाल्या नंतर तीन वर्षात मतदार संघातील अनेक समस्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आलो आहे यात सिंचन, आरोग्य, शिक्षण, लाईट, या मुलभुत सुविधा अनेक ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. व जे काही रखडलेले सिंचन प्रकल्पां ना पूर्ण करण्यास मी प्राधान्य देत राहील व त्यासाठी पाठ पुरावा देखिल करत आहे .

शासन विकास कामंच्या मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकारयांना दिल्या मुळे विकास कामांमध्ये गती आली आहे.

जलयुक्त शिवार योजना

जलयुक्त शिवार योजना मधील दोन गावांना प्रशासकीय मंजूरी देण्यात आली आहे व गाळ काढण्याचा प्रस्ताव देखिल तयार होता पण निधि न मिळाल्यामुळे ते काम होवू शकले नाही.

१०:३० वाजता सुरु होणारी आमसभा दिड तास उशिरा सुरु झाली आजची आमसभा ही पं. स. पासून फारच लाब असल्याने व उन्हामुळे अनेक पदाधिकारी व नागरिकांनी आमसभेकड़े पाठ फिरवली. आम सभेला जिल्हा परिषदेचे व पं स सदस्य अगदी  मोजणे इतकेच सभेला उपस्थित होते.

उर्वरित सदस्यांनी गैरहजर राहणे पसंत केल्याने विकास कामां बाबत त्यांची भूमिका उदासीन असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. तळोदा तालुक्यात ५९ ग्रामपंचायती आहेत परिणामी या सर्व ग्रामपंचायतिंचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना आमंत्रित केले असतानाही अनेकांनी आमसभेकड़े पाठ फिरवली.

या बैठकीत आरोग्य सिंचन, बांधकाम विभाग, लघुपाठबंधारे, महसूल, विभागाच्या अधिकारयांनी आढ़ावा सादर केला. सभेचे प्रस्ताविक गटविकास अधिकारी शरद मगर यांनी केले सूत्रसंचालन मुकेश कापुरे यानी केले तर आभार पशुधन विभागाचे अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे यांनी मानले

LEAVE A REPLY

*